विद्यार्थ्याने विद्यार्थीनीला स्केच टोचून जखमी केल्याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वर्गातील विद्यार्थी डान्सचा सराव करण्यासाठी गेलेले असताना वर्गातील मुलाने एकट्या विद्यार्थीनीच्या गुप्तांगावर स्केच टोचली. हा प्रकार येरवड्यातील नागपुर चाळ येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात घडला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दुर्लक्ष केल्याप्रकरणी वर्ग शिक्षीकेवर येरवडा पोलीस ठाण्यात बालकांची काळजी आणि संरक्षण कायदा अधिनियम २०१५ च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची मुलगी नागपूर चाळ येथील शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिक्षण घेते. ती १८ मार्च रोजी शाळेत गेली असताना वर्गातील सर्व मुले-मुली डान्स क्‍लाससाठी खाली गेली होती. यावेळी झोप येत असल्याने त्यांची मुलगी वर्गात बेंचवर झोपली होती. यावेळी तीच्या वर्गातील मुलाने तीच्या बेंचवर येऊन स्केच तीच्या गुप्तांगावर टोचल्याने तीला जखम झाली. वर्ग शिक्षीकेच्या ताब्यात पिडीत मुलगी असताना, दुर्लक्ष केल्याने वर्ग शिक्षीकेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले करत आहेत.

Loading...
You might also like