संतप्त नागरिकांनी कत्तलखान्यांचा जैवकचरा टाकला महापालिकेच्या दारात 

अहमदनगर : पोलीसनामा

अनधिकृत कत्तल खान्यातील जैव कचरा, प्राण्यांचे अवशेष भरून बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या दिशेने निघालेला ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी अडवून महापालिकेत आणून ओतला. यामुळे जैव कच‍ऱ्यामुळे महापालिका परिसरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेमुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

[amazon_link asins=’B01HJGT33W,B01J3NJY8I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de13ee48-a76a-11e8-bfbe-cf4a3d8d2355′]

अहमदनगर शहरात महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीर कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहेत. हा कचरा कुठेही टाकला जात असल्याने ड्रेनेज लाईन तुंबत आहेत. शहरात राजरोस प्राण्यांच्या बेकायदेशीर कत्तली सुरू असून जैव कचरा कोणतीही विशेष काळजी न घेता फेकला जात आहे.

नागरिकांना बुरुडगावच्या दिशेने शहरातील एक ट्रॅक्टर ट्रॉलीभर प्राण्यांचा जैव कचरा घेऊन येताना दिसला. एक किलोमिटर अंतरापासून रस्त्यावरच  ट्रॉलीतील अवशेष गळत होते. गावक‍ऱ्यानी  ट्रॅक्टरला अडवून हा कचरा उचलून घेण्याचे सांगत महापालिका प्रशासनालाही कळवले. परंतु योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास थेट महापालिकेत आणून ट्रॉलीभर जैव कचरा ओतला. याप्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय महापालिका परिसरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेने महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.