बाप-लेकीची जुगलबंदी ! चिमुकलीनं दिली वडिलांना ‘टफ’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह परदेशात कोरोनाच्या काळात अनेक लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मांजेश्वर ब्रदर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पुन्हा आणखीन एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे घरात लहान मुलांसोबत वेळ घालवणार्‍या वडिलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वडील आणि मुलीमधली ही जुगलबंदी मनाला भावणारी आहे. या चिमुकलीचे सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बाप-मुलीची जुगलबंदी लोकांना आवडली आहे.

वडील इंग्रजीमध्ये एक गाणे गात आहेत आणि मुलगी तिच्या गोड आवाजात गाणे गात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 हजार 400 लोकांनी पाहिला आहे. 300 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक वेळा रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये वडील गिटार वाजवित गाणे गात आहेत. त्यांच्या शेजारी बसलेली चिमुकली खेळत गाणे गात आहेत. यादरम्यान चिमुकली आणि वडील यांच्यातली जुगलबंदी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.