नोकरीची चिंता सोडा Amul च्या सोबत सुरू करा बिझनेस, पहिल्या दिवसापासून होईल मोठी कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका बिझनेस बाबत सांगणार आहोत, जो सुरू करून तुम्ही पहिल्या दिवसापासून मोठी कमाई करू शकता. डेयरी प्रॉडक्ट बनवणारी कंपनी अमूलसोबत बिझनेस करण्याची सध्या मोठी संधी आहे. अमूल नव्या वर्षात सुद्धा फ्रेंचायजी ऑफर करत आहे. छोट्या गुंतवणुकीतून दर महिन्याला कमाई करता येऊ शकते. अमूलची फ्रेंचायजी घेणे फायद्याचा सौदा आहे. यामध्ये नुकसान नाहीच्या बरोबर आहे.

2 लाखापासून सुरू करू शकता बिझनेस
अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेयरिंगशिवाय फ्रेंचायजी ऑफर करत आहे. एवढेच नव्हे, अमूलची फ्रेंचायजी घेण्याचा खर्च सुद्धा खुप जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरूवातीपासूनच चांगला फायदा होऊ शकतो. फ्रेंचायजी द्वारे दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र, हे जागेवर अवलंबून आहे.

अमूल दोन प्रकारची फ्रेंचायजी ऑफर करत आहे. पहिली अमूल आउटलेट, अमूल पार्लर किंवा अमूल क्युऑस्कची फ्रेंचायजी आणि दुसरी अमूल आयस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी. जर तुम्ही पहिल्यामध्ये गुंतवणूक केली तर 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर दुसर्‍या फ्रेंचायजी बाबत विचार करत असाल तर 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये द्यावे लागतील.

एवढे मिळते कमीशन
अमूल आऊटलेट घेतल्यानंतर कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजे एमआरपीवर कमीशन देते. यामध्ये एका मिल्क पाउचवर 2.5 टक्के, मिल्क प्रॉडक्ट्सवर 10 टक्के आणि आयस्क्रीमवर 20 टक्के कमीशन मिळते. अमूल आयस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी घेतल्यास रेसिपी बेस्ड आयस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकेलेट ड्रिंक वर 50 टक्के कमीशन मिळते. तर, प्री-पॅक्ड आयस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

एवढ्या जागेची आवश्यकता
जर तुम्ही अमूल आउटलेट घेतले तर तुमच्याकडे 150 चौ.फु. जागा असायला हवी. तसेच, अमूल आयस्क्रीम पार्लरची फ्रेंचायजीसाठी किमान 300 चौ.फु. जागा असावी.

असे करा अप्लाय
जर तुम्हाला फ्रेंचायजीसाठी अप्लाय करायचे असेल तर तुम्हाला [email protected] वर मेल करावा लागेल. याशिवाय या लिंक http://amul.com/m/amul-scooping-parlours वर जाऊन सुद्धा माहिती घेता येईल.