आमिरच्या ‘3 Idiots’ चा खरा हिरो वांगचुकनं शेयर केला व्हिडीओ, चीनला धडा शिकवण्याचे केलं ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : भारतीय फिल्म- 3 इडियट्समधील फुनशुक वांगडू या भूमिकेद्वारे देशात आपली ओळख निर्माण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी लोकांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते चीनला धडा शिकवण्यासाठी काय करता येईल हे सांगतात. सोनम वांगचुक म्हणतात, यावेळी चीनला उत्तर देण्यासाठी भारताच्या बुलेट पॉवरपेक्षा वॉलेट पॉवर उपयोगी पडेल.

वांगचुक यांचे म्हणणे आहे की, चीनला हरवण्यासाठी बुलेटची ताकद तर लष्कर दाखवेलच, नागरिकांनी वॉलेटची ताकद दाखवली पाहिजे. व्हिडिओमध्ये ते म्हणतात, आपल्याला चीनी सामान खरेदी करणे बंद केले पाहिजे, ज्याद्वारे चीनला मोठी रक्कम मिळते आणि चीन त्यामधून शस्त्रांमध्ये गुंतवणूक करतो.

वांगचुक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. ट्विटरवर बायकॉट मेड इन चायना हा ट्रेंड सुद्धा करत आहे. त्यांनी लोकांना एक आठवड्यात चीनी सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप सोडण्याचे आवाहन केले आहे.

यासाठी आपल्या व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक म्हणतात, मी आपल्या चीमध्ये तयार झालेल्या फोनपासून एक आठवड्याच्या आत दूर होणार आहे. एक वर्षात त्या सर्व वस्तूंपासून दूर होणार आहे, ज्या चीनमध्ये तयार झाल्या आहेत. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मेड इन चायनाचा संदेश 100 लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आहे.