‘या’ विद्यार्थ्यानं केला स्मार्ट डस्टबीनचा ‘अविष्कार’, कचरा भरल्यावर महानगरपालिकेला जातो ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद येथे राहणाऱ्या १२ वर्षीय एका विद्यार्थ्याने स्मार्ट डस्टबीनचा अविष्कार केला आहे. मोहम्मद हसन असे या मुलाचे नाव असून तो सध्या आठवीत शिकत आहे. दोन दिवसांच्या मेहनतीने त्याने हे स्मार्ट डस्टबिन बनवले आहे. स्मार्ट डस्टबीनची कल्पना त्याला स्वच्छ भारतचा एक व्हिडीओ पाहून आली.

या आधीही या विद्यार्थ्याने एक सर्विस रोबोट बनवलेला आहे ज्याला कमांड दिल्यावर तो हवे ते काम करू शकतो आणि हा रोबोट बनवण्यासाठी मोहम्मदला केवळ १५ दिवस लागले.

कसं काम करतं ‘स्मार्ट डस्टबिन’ ?

मोहम्मद ने सांगितले की या डस्टबीनमध्ये अल्ट्रासानिक सेन्सर लागलेले आहेत आणि वाय – फायशी कनेक्ट असल्यामुळे कचरा भरल्यानंतर महानगरपालिकेला याबाबतचा अलर्ट जातो.

स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यासाठी मदत होऊ शकते ‘स्मार्ट डस्टबीनची’

मोहम्मद ने सांगितले की, स्वच्छ भारत अभियानाच्या योजनेसाठी हा उपक्रम खूप फायदेशीर ठरेल आणि यामुळे स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे यशस्वी होईल. त्यामुळे या उपक्रमाला स्वच्छ भारतमध्ये सामाविष्ट करायला हवे.

आठवीमध्ये असूनही हा विद्यार्थी इतका हुशार आहे की तो इंजिनीरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्लास घेतो. यावरूनच मोहम्मद च्या हुशारीचा अंदाज येऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –