बकेट खरेदी प्रकरणात अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा : काँग्रेस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेतील बकेट खरेदी संदर्भात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केलेल्या आरोप प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ त्या’ नगरसेवकांची नावे जाहीर करा अशी मागणी केली आहे.

अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी काल (बुधवारी) स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेतील काही नगरसेवक ठेकेदारांना १०००० पैकी ५०० खरेदी करा आणि उर्वरित पैसे द्या असे सांगतात असा गौप्यस्फोट केला. त्यानी केलेल्या या आरोपामुळे महापालिका कारभाराची लक्तरे निघाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निवेदनाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मागणी केली आहे. निंबाळकर यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून यातील सत्य समोर आले पाहिजे अन्यथा सर्व नगरसेवकांकडे लोक संशयाच्या नजरेने पाहतील. हा प्रकार ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमताशिवाय होऊ शकत नाही असा दावा ही शिंदे यांनी केला आहे.

निंबाळकर यांनी हा भ्रष्टाचाराचा प्रकार माहित असुनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करता आरोप करणे हे अकालनिय आहे. या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही नावे जाहीर करा अशी मागणी केली आहे. समितीच्या बैठकीत निंबाळकर यांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर या समितीच्या सदस्यांनी संबधित ठेकेदार आणि नगरसेवकआची नावे जाहीर करा, अधिकारी काय डोळे झाकून बकेट खरेदीची दिले काढतात का ? असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते. नगरसेवक हे बकेट, कापडी पिशव्या, बाकडी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दाखल करतात. यावर्षी बकेट खरेदी करिता पाच कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. या बकेट खरेदीच्या प्रक्रियेवर प्रशासन नजर ठेवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.