पोलिस स्टेशनमधील वाळूच्या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू: DYSP ऐश्वर्या शर्मा

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) –  शिरुर तालुक्यात सध्या गाजत असलेल्या वाळू प्रकरणात रोज वेगवेगळे प्रकार समोर येत आहे.आता शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आवारात वाळूचा डंपरमध्ये रात्रीत क्रश सॕण्ड टाकण्यात आलेल्या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली असून जो कुणी जबाबदार पोलीस अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी यामध्ये दोषी असेल त्यावर कठोर पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी दिली.

गेल्या चार दिवसांपासून शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये क्रशसॅंड भरण्याचा व चुकीचा पंचनामा करण्यावरुन महसूल व पोलिस प्रशासन अशा दोन्ही बाजुकडून एकमेकांना वाचविण्याचा प्रकारही सुरू असल्याचे बोलले जात आहेत. याबाबत सदर डंपरचा फेरपंचनामा होवून त्यात पूर्वीच्या पंचनाम्यात तब्बल पाच ब्रास वाळू कमी दाखविल्याचे निष्पन्न झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून पोलीस व महसूल या दोन्ही खात्यांच्या संगणमताचा विषय या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. याबाबत दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील गेल्या काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही प्राप्त केले आहे. त्या फुटेजमध्ये ज्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारातील ट्रकमध्ये वाळू ऐवजी क्रशसॅंड टाकली आहे, त्यांचा शोध घेवून सहभागी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई करणार आहोत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने डंपर पकडला असला तरी दंडात्मक कारवाई जास्त व्हावी म्हणून पोलिसांनी सदर ट्रक पंचनाम्यासाठी महसूल विभागकडे दिला. पुढे पोलिस स्टेशनच्या आवारातच क्रशसॅंड भरण्याचा प्रकार घडल्याने आम्ही तातडीने खात्यांतर्गत चौकशी लावली असून दोषींवर कारवाई होणारच असल्याचे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले आहे.

माञ शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करुन लावलेल्या डंपर मधील वाळू मोजण्यात पहिली चुक महसूल शिक्रापुर,वाळू प्रकरण,शिक्रापूर पोलीस स्टेशन,क्रश सॕण्ड,पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा,महसूल,विभाग, कर्मचाऱ्याची झाली तर दूसरी चुक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याची झाली असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे याबाबत मुळ डंपर मालकावर हा अन्याय होत असल्याचा युक्तीवाद शिरुर शहरात एका पक्षाच्या संघटना पातळीवर सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर याबाबत मुळ ट्रक मालकाच्या उपस्थितीत तिसरा पंचनामा करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती शिरुर तहसिल कार्यालयातील खात्रीशीर सूत्रांनी दिली.