भय्यू महाराजांची मुलगी कुहू हिची झाली पाच तास पोलीस चौकशी

इंदूर : मध्य प्रदेश वृत्तसंस्था – देशभर प्रसिद्ध असणारे अध्याधित्मिक गुरु भय्यू महाराज यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी त्यांच्या आत्महत्ये नंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. विश्वासू सेवक विनायक आणि एका तरुणीच्या बॅकमेलिंग मुळे अध्यात्म गुरु भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली असा पोलीसांचा संशय आहे. गेल्या चार दिवसापासून याच अंगाने पोलीसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील संशयित तरुणी भय्यू महाराजांची कन्या कुहू हिची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आलेली तरुणी आहे असे सेवक विनायक याने पोलीसांना सांगितले आहे. याच माहितीच्या आधारावर पोलीसांनी कुहूची पाच तास चौकशी केली परंतु कुहुने सेवक विनायक खोटे बोलत असल्याचे म्हणले आहे.

कुहूची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना कुहुने सांगितले कि संशयित तरुणी हि माझी काळजी घेण्यासाठी नेमण्यात आलेली नव्हती. ती आमच्या घरात सदैव असायची. घरातील सर्व कामे ती करत असायची असे कुहू म्हणाली आहे. १२ जून रोजी अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या आत्महत्येचा खुलासा आता होऊ लागला आहे. कुहूने दिलेल्या माहिती नुसार, आपल्या आईचे निधन झाल्या नंतर  आपण पुण्याला राहायला गेलो. तरीही ती तरुणी आपल्या घरी काम करत असे त्यानंतर डॉ. आयुषी सोबत बाबांचे लग्न झाल्यानंतर ती तरुणी तेथून निघून गेली. अशी माहिती कुहुने पोलिसांना दिली आहे.

कुहुने दिलेल्या माहिती नंतर पोलीसांनी सेवक विनायक आणि त्या तरुणीला चौकशीसाठी बसवले त्यानंतर त्यांनी त्यांचे जबान नोंदवून घेतले. आता लवकरच भय्यू महाराजांच्या हत्येचा तपास होणार असून त्यांच्या आत्महत्येचे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे असा विश्वास पोलीस तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा सर्वानाच हादरा बसला होता. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. तर त्यांच्या आत्महत्येचे प्रकरण विस्मृतीत हि गेले होते. परंतु भय्यू महाराजांच्या गाडीचे  चालक कैलाश पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आता भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचा तपास काय लागणार या बद्दल सर्वानाच उत्सुकता आहे.