INS Vikrant Fund Case | आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – INS Vikrant Fund Case | INS विक्रांतच्या बचावासाठी जो निधी (INS Vikrant Fund Case) सामान्य लोकांकडून गोळा करण्यात आला होता तो निधी जमा झाला नसल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला होता. यासंबंधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somiaya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात (INS Vikrant Fund Case) पिता – पुत्रांवर अटकेची टांगती तलवार होती मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. अशातच हाय कार्टाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन वाढवण्याचे आदेश न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत. (Interim Anticipatory Bail)

 

हाय कोर्टाने 14 जूनपर्यंत अटकपूर्व जामीन वाढवण्याचे आदेश दिल्याने सोमय्या पिता – पुत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. विक्रांत जहाजच्या डागडुजीसाठी (INS Vikrant Fund Case) अभियान सुरू केलं होतं. या अभियानातून जे पैसे जमा होणार होते ते राज्यपालांकडे जमा करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र ते पैसे राज्यापालांकडे जमा झाले नाहीत, असा आरोप सोमय्या पिता – पुत्रांवर आहे.

जमा केलेल्या निधीचे पैसे कुठे गेले याबाबत सोमय्यांना कोर्टामध्ये सुनावणीवेळी विचारलं होतं.
त्यावेळी, विक्रांतसाठी जमा केलेले पैसै जमा करायला गेलो होतो मात्र राजभवनाचं खातं नसल्यामुळे ते पैसे पक्षाच्या खात्यात जमा केल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतंं.

 

दरम्यान, राज्यात अनेक विषयांवरून वातावरण तापलं असताना राऊतांनी विक्रांतवरून सोमय्यांवर निशाणा साधला होता.
सोमय्यांनी नेमका किती निधी जमा केला याबाबत आता विचारणा केली जात आहे.

 

Web Title :- INS Vikrant Fund Case | bombay mumbai high court extends interim anticipatory bail to kirit somaiya and neil somaiya in ins vikrant fraud case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा