INS Vikrant Vs IAC Vikrant | 1971 च्या युद्धातील हिरो ठरलेली INS विक्रांतपेक्षा किती वेगळी आहे नवीन IAC Vikrant, जाणून घ्या फरक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – INS Vikrant Vs IAC Vikrant | कशी वाटते स्वत:शीच स्वत:ची लढाई ? INS Vikrant विरूद्ध IAC Vikrant. एक ब्रिटनमधून आयात केलेले हे विमानवाहू जहाज तर दुसरे स्वत: बनवले आहे. पहिल्या विक्रांतने 36 वर्षे देशाची सेवा केली. 1971 च्या युद्धात पाकिस्तानची धुव्वा उडवला होता. पाकच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांसमोर मृत्यू बनून उभे होते आयएनएस विक्रांत. स्वदेशी IAC Vikrant बनविण्यासाठी 18 वर्षे लागली परंतु ते आधुनिक, शक्तिशाली, सक्षम आणि घातक आहे. (INS Vikrant Vs IAC Vikrant)

 

1961 मध्ये भारतीय नौदलात सामील झालेल्या आएनएस विक्रांतचे ब्रीदवाक्य होते ’जयेम सं युधिस्पृध’ म्हणजेच जो कोणी माझ्याशी लढेल त्याला मी पूर्णपणे पराभूत करीन. आजही हेच आयएसी विक्रांतचे ब्रीदवाक्य आहे. हा ऋग्वेदातून घेतलेल्या ऋचा (मंत्र) चा भाग आहे. जे इंद्रदेवाला उद्देशून म्हटले आहे की, तुझ्या संहारक शस्त्राने मला जी शक्ती प्राप्त झाली आहे, त्याद्वारे मी जिंकेन. (INS Vikrant Vs IAC Vikrant)

 

जुन्या विक्रांतचा पेनंट नंबर आर 11 होता, आजही विक्रांतचे नाव आर 11 आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोघांचे नाव ’विक्रांत’ आहे. म्हणजेच ज्याला युद्धात कोणीही हरवू शकत नाही. हा शब्द संस्कृतमधील आहे. म्हणजे शूर. त्याचे मूळ भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात आहे. ज्यामध्ये पांडवांच्या काही सेनापतींच्या शौर्याचा उल्लेख आहे. आयएनएस विक्रांतला 36 वर्षे सेवा केल्यानंतर 15 वर्षे मुंबईत संग्रहालय म्हणून तैनात केले होते. लोक त्याची क्षमता बघायचे. त्यानंतर 2004 मध्ये ते स्क्रॅप करण्यात आले.

 

INS Vikrant पेक्षा दुप्पट मोठी आहे स्वदेशी IAC Vikrant

जुन्या आयएनएस विक्रांतचे डिस्प्लेसमेंट 16 हजार टन होते. ते फक्त 700 फूट लांब होते. त्याचा बीम 128 फूट होता. तर ड्रॉट 24 फूट. तर आयएसी विक्रांतबद्दल बोलायचे तर त्याचे डिस्प्लेसमेंट 45 हजार टन आहे. 862 फूट लांब. बीम 203 फूट असून ड्रॉट 28 फूट आहे. याची उंची 194 फूट आहे. आयएनएस विक्रांत ताशी 46 किलोमीटर वेगाने धावू शकते होते. तर आयएसी विक्रांत ताशी 56 किलोमीटर वेगाने समुद्रातून प्रवास करू शकते.

जुन्या आयएनएस विक्रांतमध्ये बसवलेले इंजिन्स त्याला 40 हजार हॉर्सपॉवरची शक्ती देत होते. तर आयएसी विक्रांतमध्ये बसवलेले इंजिन त्याला 1.10 लाख हॉर्सपॉवरची शक्ती देतात. जुन्या विक्रांतवर एकूण 1110 अधिकारी किंवा खलाशी राहू शकत होते. तर नवीन विक्रांतमध्ये 1700 नौदलाचे अधिकारी किंवा कर्मचारी राहू शकतील.

जुन्या विक्रांतमध्ये हॉस्पिटल नव्हते. नवीन विक्रांतमध्ये टेस्ट लॅबसह 16 खाटांचे हॉस्पिटल देखील आहे. जुन्या विक्रांतच्या स्वयंपाकघरात खलाशी स्वत: अन्न शिजवायचे. आता नवीन विक्रांतमध्ये तीन स्वयंचलित गॅली आहेत. म्हणजेच अत्याधुनिक मशिनद्वारे एका दिवसात 5 हजार प्लेट्स जेवण बनवता येईल अशी तीन स्वयंपाकघरे आहेत. येथे दर तासाला 3000 भाकरी भाजता येऊ शकतात.

 

तेव्हा आणि आताच्या विक्रांतमध्ये वापरण्यात आलेली शस्त्रे आणि जेट विमाने

1961 मध्ये भारतीय नौदलात सामील झालेल्या INS Vikrant मध्ये यापूर्वी 40 मिमीच्या 16 बोफोर्स विमानविरोधी तोफा बसवण्यात आल्या होत्या.
ज्या नंतर 8 पर्यंत कमी करण्यात आल्या. याशिवाय त्यावर हॉकर सी हॉक (Hawker Sea Hawk),
सी हॅरियर (STOVL) लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती.
याशिवाय सी किंग एमके 42बी (Sea King Mk 42B) आणि HAL Chetak हेलिकॉप्टर तैनात करण्यात येत होते.
याशिवाय ब्रेग्ट एलिस बीआर 1050 अँटी सबमरीन एअरक्राफ्ट सुद्धा तैनात होती.
जुन्या एयरक्राफ्ट कॅरियरवर कमाल 23 विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकत होती.

आयएसी विक्रांत (IAC Vikrant) वर MiG-29K लढाऊ विमानांचे दोन स्क्वॉड्रन आणि 10 Kmaov हेलिकॉप्टरचे स्क्वॉड्रन तैनात केले जाऊ शकतात. भारतात अमेरिकेतून आलेले मल्टीरोल MH-60R Romeo हेलिकॉप्टरही तैनात केले जाईल. या विमानवाहू नौकेवर एकूण 30 ते 35 विमाने तैनात करता येतील.

आयएसी विक्रांतवरून 32 बराक-8 क्षेपणास्त्रे डागता येऊ शकतात. जमिनीवरून हवेत मारा करणारे (Surface to Air) बराक क्षेपणास्त्र 500 मीटर ते 100 किमीपर्यंत हल्ला किंवा संरक्षणासाठी डागता येते.
60 किलो वॉरहेड वाहून नेऊ शकते. त्याचा कमाल वेग ताशी 2469 किमी आहे.

आयएसी विक्रांत चार ओटोब्रेडा (Otobreda) 76 मिमी ड्युअल पर्पज कॅनन लावण्यात आले आहेत.
ही 76.2 मिमी कॅलिबरची रिमोटने चालणारी तोफ आहे.
ती 360 अंशात फिरून शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने किंवा युद्धनौका यांच्यावर गोळीबार करू शकते.
तिची रेंज 16 ते 20 किमी पर्यंत आहे. चार AK 630 CIWS पॉइंट डिफेन्स सिस्टम गन आहेत.
ही फिरणारी हेवी मशीन गन असते, जी लक्ष्याच्या दिशेने गोळीबार करत राहते.
ती प्रति मिनिट 10 हजार राउंड या वेगाने फायर करत राहते.

1961 च्या आयएनएस विक्रांतला ताशी 26 किलोमीटर वेगाने चालवले असते तर ती एकूण 22 हजार किलोमीटर अंतर पार करू शकत होती.
वेग प्रतितास 43 किमी केल्यास कमाल रेंज 11,500 किमी मिळत होती.
आयएसी विक्रांतबद्दल बोलयचे तर ती ताशी 56 किमी वेगाने 15 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकते.
जुन्या विक्रांतवर लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी कॅटपल्ट असिस्टेड टेक ऑफ म्हणजेच CATO अशी व्यवस्था होती.
जी नंतर 9.75 डिग्री स्की जंपमध्ये बदलली गेली. IAC विक्रांतमध्ये STOBAR लॉन्च सिस्टम आहे.
याचा अर्थ शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी. सोबत स्की जंपसुद्धा.

 

500 हून अधिक कंपन्या स्वदेशी विक्रांत बनवण्यात गुंतल्या आहेत

विक्रांतचे डिझाईन आणि उत्पादन देशातच केले गेले आहे.
या युद्धनौकेला सर्वोत्कृष्ट स्वयंचलित मशीन, ऑपरेशन, शीप नेव्हिगेशन आणि बचाव प्रणालीने सुसज्ज केले आहे.
कोचीन शिपयार्डसह, 550 भारतीय कंपन्यांनी ती बनविण्यात मदत केली आहे.
याशिवाय 100 MSME कंपन्यांचाही सहभाग होता. या युद्धनौकेचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवले आहेत.
हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतीय नौदल सातत्याने आपली क्षमता वाढवत आहे.

 

1971 च्या युद्धात INS Vikrant ने केली होती पाकची धुलाई

1971 च्या भारतासोबतच्या युद्धादरम्यान पाकिस्तानने गुप्तपणे PNS गाझी पाणबुडी भारतीय विमानवाहू युद्धनौका INS Vikrant बुडवण्यासाठी पाठवली होती.
पण भारतीय नौदलाच्या INS Rajput ने तिला नष्ट केले होते. ही गोष्ट 14 नोव्हेंबर 1971 ची आहे.
गाझी पाणबुडी गुप्तपणे 4800 किमीचा प्रवास करत अरबी समुद्र पार केला आणि बंगालच्या उपसागरात पोहोचली. कमांड जफर मोहम्मदच्या हाती होती.
ज्यामध्ये 10 अधिकारी आणि 82 खलाशी होते. 4 डिसेंबर 1971 रोजी PNS Ghazi रहस्यमयरीत्या बुडाले.
भारतीय नौदलाने गाझीला बुडवल्याचा दावा केला आहे. मात्र पाकिस्तानने याचा इन्कार केला आहे.

 

Web Title : –  INS Vikrant Vs IAC Vikrant | ins vikrant vs iac vikrant which one is better british hms hercules or indigenous aircraft carrier of india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा