राज्य उत्पादन शुल्क विभाच्या निरीक्षकावर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –   नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागच्या निरीक्षकावर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिअर बार कायम स्वरूपी नावावर करण्यासाठी लाच मागितले आहे.

सुभाष खंडेराय असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुभाष हे बिलोली राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक आहेत. यातील तक्रारदार यांना एफ. एल. 03 अनुज्ञत्ती क्र. 90 (बिअर बार) त्यांच्या नावाने कायम स्वरूपी वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची पडताळणी करून याचा अहवाल नांदेड जिल्हा अधीक्षक यांना सादर करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती 1 लाख रुपयांची लाच घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.