प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ! Lockdown व रमजानच्या पवित्र महिन्यात गरजू लोकांसाठी हाजी आबीद सय्यद ठरले ‘अन्नदाता’ ! महिन्यात 500 कुटुंबांना दिले अन्न धान्याचे किट, त्यांची महिन्याची चिंता मिटली

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – ( बासित शेख ) लॉकडाऊन असल्याने खरेदीसाठी बाहेर पडण्याला नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यात रमजानचे रोजे सुरु असताना खरेदीची होणारी गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन ‘कौसरबाग कोंढवा खिदमत फाउंडेशन’ चे संस्थापक हाजी आबिद सय्यद यांनी नागरिकांची ही समस्या सोडविण्याचे व्रत आंगीकारले आहे. ईदनिमित्त कोंढवा वासियांना १० हजार लिटर दुध वाटपाचा उपक्रम आखला आहे.

पहा  Video :

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3020946261453264&id=100006137592366
त्यामुळे नागरिकांना ईदला वेळेत दुध मिळणार का याची चिंता करण्याची गरज नाही. जास्तीतजास्त मुस्लिम बांधवांपर्यंत हे दुध पोहचविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. त्यातूनच नागरिकांपर्यंत हे दुध पोहचणार आहे.

हाजी आबिद सय्यद गेली २० वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. 2020 ते 2021 कोरोना महामारीच्या प्रादुर्भावावर रात्रंदिन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ची पूर्तता करून देणे गरीब गरजू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना लागणारे औषध उपचार चा खर्च व रेमडिसिव्हीर इंजेक्शन ची वेवस्था करून त्याचे पैशे देvऊन प्राईम सेवा देऊन लाख मोलाचे योगदान करत आहेत.

File photo

हाजी आबिद यांनी सांगितले की देवानं आपल्याला खूप काही दिले आहे.इस्लाम धर्म मध्ये पवित्र रमजानच्या महिन्यात जकात अदा करणे फर्ज आहे . ज्यांच्यावर जकात फर्ज आहे त्यांनी आपली जबाबदारीने जकात अदा केले तर कोणीही गरजू राहणार नाही .

या पूर्वीच्या लॉकडाऊन व रमजानच्या पवित्र महिन्यात आबीद सय्यद यांनी गरजु लोकांना मदत केली. यंदाच्या रमजान मध्ये एका महिन्यांत ५०० कुटुंबांना एक महिना पुरेल व घरातील 5 वेक्ती जेवतील इतका मोफत अन्नधान्य किट, व प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत ,इफ्तार साठी फळं , ईद साठी सुकामेवा इत्यादी वाटप करून त्यांच्या सोबत ईद साजरी करत आहे .

गतवर्षीप्रमाणे यंदाही ईदसाठी कोंढवावासियांना कौसरबाग कोंढवा खिदमत फाऊंडेशनचे संस्थापक हाजी आबिद सय्यद यांनी दुध वाटपाचे व्यवस्थापन केले आहे. त्यासाठी नागरिकांनी खाली दिलेल्या सहकार्‍यांशी संपर्क साधावा. या सहकार्‍यांकडून प्रत्येकाला कूपन देण्यात येईल. तसेच प्रत्येकी २ ते ३ लिटर दुध दिले जाणार आहे.

यादरम्यान नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नियमांचे पालन करणार्‍यांना दुध वाटप केले जाईल, असे आवाहन हाजी आबिद सय्यद यांनी केले आहे.

हाजी आबिद सय्यद : संस्थापक 9823051137
हाजी तौसिफ शेख : सचिव
9970707565
हाजी कासीम सय्यद : खजिनदार
8888556514
हाजी बासित शेख : विशेष कार्यकारी सल्लागार
9579411765
जफर खान कोंढवा ४२, : विशेष सहकारी
8856815587
हसन सय्यद : सदस्य
7798962386
मोसीन चांद : सदस्य
7798886199