जेव्हा हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन, रतन टाटांनी केलं सुरक्षित लँडिंग ! जाणून घ्या पूर्ण किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्याबद्दल आजवर आपण अनेक किस्से ऐकले आहेत. आज आपण ते 17 वर्षांचे असताना घडलेला एक धाडसी किस्सा जाणून घेणार आहोत जो खूप कमी लोकांना माहित आहे.

खूप कमी वयात असताना रतन टाटा यांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एक चिंताजनक घटना घडली होती. परंतु त्यांनी विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं होतं. त्यावेळी टाटा अवघ्या 17 वर्षांचे होते.

जेव्हा टाटांनी विमानाचं उड्डाण घेतलं, तेव्हा त्याचं इंजिन खरबा झालं जे कोणताच प्रतिसाद देत नव्हतं. यावेळी प्रसंगावधान दाखवत त्यांनी असं काही केलं जे इतर कोणालाही करणं शक्य झालं नसतं. कठिण परिस्थिती ओढवली असतानाही त्यांनी विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं.

https://www.instagram.com/p/CDNzkV0nyVn/?utm_source=ig_embed

जेआरडी टाटा यांनी 1932 साली पहिल्या एअरलाईन्सची स्थापना केली. याला टाटा एअरलाईन्स असं नाव दिलं. नंतर याचं नाव एअर इंडिया ठेवण्यात आलं. सर्वात आधी कराची ते मुंबई पर्यंत उड्डाण केलं गेलं होतं.

image.png

रतन टाटा यांना विमानं खूप आवडतात. फक्त सामान्य विमानंच नाही, तर ते फायटर जेट एफ 16 सुध्दा उडवतात. रतन टाटा देशातील पहिले असे उद्योगपती आहेत ज्यांना फायटर विमानं उडवण्याची संधी मिळाली होती.