त्या शाळकरी मुलीने २५० मुलींना वाटले सॅनिटरी नॅपकिन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या उत्पादनावर आणि जनगागृतीवर सिनेअभिनेता अक्षय कुमार याने मागील काही दिवसापूर्वी  ‘पॅडमॅन’ हा चित्रपट काढला होता. तो चित्रपट पाहून प्रभावित झालेल्या मुलीने महाराष्ट्रातील शहापूर तालुक्यातील २५० मुलींना वर्षभर पुरतील एवढी सॅनिटरी नॅपकिन त्या मुलीने मोफत वाटली आहेत. रीवा तुळपुळे असे त्या मुलीचे नाव असून ती सॅनिटरी नॅपकिन वाटण्यासाठी दुबई वरून भारतात आली होती.

काही दिवसापूर्वी  ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पहिल्या नंतर आपण आपल्या देशातील मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रसाला हलके करण्यासाठी काही करू शकतो का असा विचार केला. तेव्हा आपल्या मनात आले कि आपण लोकवर्गणी करून शाळकरी मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा विचार आला त्यानंतर दुबई मध्ये वर्गणी गोळा करून महाराष्ट्रात आले आणि येथील मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटले असे  रीवा तुळपुळे म्हणाली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार  निरंजन डावखरे यांना रीवा तुळपुळे हिने आपली संकल्पना बोलून दाखवली त्यानंतर त्यांनी तिला या कामाबद्दल प्रोत्साहन दिले. तिने दुबई मध्ये लोकवर्गणी करून २५० मुलींना पुरतील एवढी  सॅनिटरी नॅपकिन खरेदी केली आणि आमदार डावखरे यांच्या पुढाकाराने ‘समन्वय प्रतिष्ठान’ या डावखरेंचा समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून ती मुलींना वाटली गेली अशा समाज उपयोगी कृतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि कौतुक केले असून रीवा तुळपुळे हिने सॅनिटरी नॅपकिन वाटपाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती .

काय आहे  ‘पॅडमॅन’ चित्रपटात 

अक्षय कुमार त्यांच्या भूमिकेतून साकार झालेला हा चित्रपट असून यात मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांच्या लैंगिक भागाच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटरी नॅपकिन किती आवश्यक आहे हे दाखवण्यात आले आहे. गरज हि शोधाची जननी आहे हि म्हण या चित्रपटात अधोरेखित होती. चित्रपटाचा नायक अक्षय कुमार सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचे मशीन स्वतः हाताने बनवतो त्यासाठी त्याला येणारे कष्ट चित्रपटात दाखवले आहेत. माणूस समाजात एकदा बदल घडवण्यासाठी जेव्हा वेडापिसा होतो तेव्हा त्याच्या घरातीलच लोक त्याला कसे साथ देत नाहीत हे या चित्रपटात दाखवले आहे. एका ध्येय वेड्या व्यक्तीचा अतुलनीय प्रवास या चित्रपटात रेखाटला असून हा चित्रपट जगण्याची वेगळी ऊर्जा प्रधान करतो.