‘हा’ पुण्याचा नवा ‘गोल्डमॅन’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गोल्डमॅन म्हणून सर्वात प्रसिद्ध झाले ते मनसेचे आमदार स्वर्गीय. रमेश वांजळे. त्यांच्या अंगावर सोने घालण्याच्या स्टाईलने ते फक्त पुण्यात नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात फेमस होते. परंतू आता पुण्यात आणखी एका गोल्डमॅनची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवूड स्टार बप्पी लहरी यांच्याकडून सोने परिधान करण्याची प्रेरणा घेत पुण्यातील या तरुणाने तब्बल १.५ कोटी रुपयांचे सोने अंगावर परिधान केले आहे. हा गोल्डमन म्हणून प्रसिद्ध होत असलेला तरुण आहे प्रशांत सपकाळ.

सोशल मिडियात सध्या त्यांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहे, याच सोशल मिडियात त्याला गोल्डमॅन म्हणून ओळखले जात आहे. प्रशांतला एवढे सोने परिधान करण्याची प्रेरणा त्यांच्या लहानपणी गायक बप्पी लहरींकडून मिळाली. त्याच्या अंगावर तो सध्या ५ किलो वजनाचे सोने परिधान करत आहे.

अंगावर घालतो 5 किलो सोने
प्रशांत सपकाळ हा तरुण अंगावर सोन्याचे ब्रेसलेट, लॉकेट, चैन, असे एकूण ५ किलो वजनाचे सोने घालतो. स्वता:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांने भरपूर कष्ट घेतले आहेत. त्याला सोन्याची आवड आहे. सोशल मिडियावर सध्या त्याच्या फोटोंची चर्चा आहे. लोक त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहे.

हा तरुण पुण्यातील असून मध्यमवर्गीय कुटूंबात त्याचा जन्म झाला. प्रशांतचा स्वत: चा व्यवसाय आहे. त्याच बरोबर तो सामाजिक कार्यात हातभार लावतो, गरजू गोरगरीब लोकांना मदत करतो.

Loading...
You might also like