Indian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Facebook ने Instagram मधील एक बग (Bug) शोधण्यासाठी एका 21 वर्षीय भारतीय विकासकाला 30, 000 हजार डॉलर्सचे बक्षीस (Indian Developer Awarded 30000 Dollars) दिले आहे. भारतीय चलनात या रक्कमेचे मूल्य 22 लाख रुपयांच्या जवळपास आहे. मयूर फरतडे (Mayur Fartade) असे या विकासकाचे नाव आहे. त्याने फेसबुकच्या प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममध्ये (Facebook Bug Bounty Program) एक मोठी त्रुटी शोधून काढली आहे. या बगचा वापर करून कोणीही इन्स्टाग्रामवर कोणाच्याही खाजगी खात्यात डोकावू शकत होते. त्यामुळे फेसबुकने ही चुक सुधारली आहे. instagram bug Indian developer awarded 30000 usd reward

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

मयूर हा महाराष्ट्रातील सोलापूरचा राहणारा असून तो संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. याबाबत मयूरने Medium वर एक ब्लॉग पोस्ट करून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या (Facebook Bug Bounty Program) माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे. मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी अन् अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडीओज पाहता येत होते. तसेच या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहिती देखील पाहता येत होती. विशेष म्हणजे, असे करण्यासाठी त्या युजरला फॉलो करण्याची गरज नव्हती.

Web Title :- instagram bug Indian developer awarded 30000 usd reward

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

Bhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांची 5 शहरात मोठी कारवाई; विविध शहरातून 12 जण ताब्यात