असे करा ‘व्हॉईस मेसेजिंग- इन्स्टाग्राममधील या मायक्रोफोन बटनाला दाबून धरून व्हॉईस मेसेजेस रेकॉर्ड करता येणार आहेत. मायक्रोफोन बटन दाबून ऑडिओ/व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा त्यादरम्यान ऑडिओ वेव्ह वाहतअसल्याचं ऍनिमेशन आपल्याला दिसेल. आपण एक मिनिटाचा व्हॉइस मेसेज पाठवू शकाल. व्हॉटस् अॅपमध्ये प्रथम ज्याला व्हॉईस मेसेज पाठवायचा आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर यादीतून निवडावा लागतो. इन्स्टाग्राममध्ये आधी व्हॉईस रेकॉर्डिंग करता येईल. त्यानंतर रेकॉर्ड झालेली व्हॉईस क्लिप एका किंवा अनेक कॉन्टॅक्टसना किंवा ग्रुपना पाठविता येईल. हे मेसेज कायम ऐकता येतील. हे थेट मित्रांसोबत चॅट प्रमाणे काम करतील.
हा व्हॉईस मेसेज रिसीव्हरच्या चॅट विंडोमध्ये डब्ल्यूएव्ही फाईलच्या रूपात पोहोचेल. तसेच, एकदा क्लिप ऐकल्यानंतर ती गायब होणार नाही.अँड्रॉइड व iOS दोन्हीवर ही सोय उपलब्ध झाली आहे.