Instagram ने दिले नवीन फीचर, आता कुणीही शेयर करू शकतो आपली स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंस्टाग्राम (Instagram) यूजर्ससाठी मोठी खुशखबरी आहे. कारण इंस्टाग्रामने एक नवीन फीचर Add Your चा अ‍ॅपमध्ये समावेश केला आहे (New feature given by Instagram). आता कुणीही यूजर आपल्या स्टोरीची लिंक शेयर करू शकतो. या फीचरद्वारे अ‍ॅड यूअर नावाचे स्टीकर लावून आपली स्टोरी लोकांपर्यंत पोहचवू शकतात. इंस्टाग्राम (Instagram) अपडेटनुसार आता कुणीही आपल्या स्टोरीची लिंक शेयर करू शकतो.

 

हे स्टिकर इतर लोकांना आपली पोस्ट अपलोड करण्यासाठी संकेताच्या रूपात काम करते. जेव्हा तुम्ही स्टिकरवर टॅप करता तेव्हा इंटरफेस त्या सर्वंना प्रदर्शित करेल ज्यांनी थ्रेडमध्ये योगदान दिले आहे आणि तुम्ही तेथून त्यांची पोस्ट पाहू शकतो.

 

असा करू शकता नवीन फीचरचा वापर

 

  • इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या स्टोरीत कंटेट अपलोड करा आणि नंतर स्टोरी क्रिएट करा.
  •  नेव्हिगेशनमध्ये एक स्टिकर टूल दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • येथे लिंक स्टिकरवर टॅप करा. आता जी लिंक शेयर करायची आहे तिचा यूआरएल टाइप करा.
  • यूआरएल टाइप केल्यानंतर Done वर क्लिक करा.
  • स्टिकर तुमच्या स्टोरीवर कुठेही ठेवू शकता. कलर व्हेरिएशनसाठी स्टिकरवर टॅप करा.

 

यांना वापर करता येणार नाही

 

इंस्टाग्रामने (Instagram) घोषणा केली आहे की, नवीन अकाऊंट आणि असे यूजर जे वारंवार वाईट भाषा आणि चुकीची माहिती, किंवा इतर कंटेट शेयर करतात ते याचा वापर करू शकणार नाहीत. ते लिंक स्टिकरपर्यंत पोहचू शकणार नाहीत.

 

हे सामुहिक मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनांतर्गत येते. अ‍ॅपने यूजरला दिवाळीत आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत जोडले जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तीन नवी स्टिकर सुद्धा लाँच केले आहेत. जेव्हा लोक स्टिकरचा वापर करून पोस्ट करतील, तेव्हा ती दिवाळी विशेष बहु-लेखक कथांमध्ये त्यांच्या फॉलोअर्सला सुद्धा दिसेल.

 

Web Title : Instagram | instagram added a new feature now everyone can share their story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | खळबळजनक ! पुण्यात ‘कंडोम’वरुन झाली खूनाच्या गुन्ह्याची उकल; जाणून घ्या प्रकरण

Pune Corona Vaccination | पुणेकरांनो… लस घेण्यासाठी जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक