फूड मार्केटमध्ये छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी उतरले ‘इन्स्टाग्राम’, ‘स्विगी’ आणि ‘झोमॅटो’सोबत केला ‘करार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूमुळे येणाऱ्या काळात ई-कॉमर्सची व्याप्ती आणि मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. यात रेस्टॉरंट्समधून जेवण मागितण्यासाठी ऑनलाईन सेवेची संधी वाढण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचा सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मपैकी एक असणारे इन्स्टाग्रामही या कामात उतरले आहे.

फूड ऑर्डर स्टिकर केले लाँच
इंस्टाग्रामने भारतातील दोन सर्वात मोठ्या ऑनलाइन फूड सर्व्हिस स्विगी आणि झोमॅटोसोबत भागीदारी केली आहे. इन्स्टाग्राम कोरोनामुळे संकटाच्या काळातून जाणाऱ्या छोट्या रेस्टॉरंट्सना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी कंपनीने एक खास स्टिकर बाजारात आणला आहे. फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामचे हे ‘फूड ऑर्डर स्टिकर’ लहान रेस्टॉरंट व्यवसायीक त्यांच्या अकाऊंटमध्ये वापरतील. ही रेस्टॉरंट्स त्यांच्या इस्टग्राम स्टोरीमध्ये हे स्टिकर लावण्यास सक्षम असतील, जेणेकरुन वापरकर्ते त्यावर क्लिक करुन अन्नाची मागणी करू शकतील.

इंस्टाग्रामवर व्यवसाय किंवा निर्माता खाते आवश्यक
हे स्टिकर वापरण्यासाठी, रेस्टॉरंटच्या मालकांकडे iOS किंवा Android मध्ये इन्स्टाग्रामचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त त्यांना इन्स्टाग्राममध्ये व्यवसाय खाते किंवा क्रिएटर खाते तयार करावे लागेल. यासह, त्यांना त्यांच्या स्टोरीत स्विगी किंवा झोमॅटो अकाउंट लिंक जोडावे लागेल. ते त्यांच्या प्रोफाईलमध्ये हे दुवे देखील जोडू शकतात. फेसबुक इंडियाच्या ई-कॉमर्स आणि रिटेल इंडस्ट्रीचे प्रमुख नितीन चोप्रा म्हणाले की, कंपनीला आपल्या वतीने छोट्या उद्योगांनाही मदत करायची आहे. ते म्हणाले की, आम्ही फूड ऑर्डरचे स्टिकर्स सुरू करीत आहोत जेणेकरून फूड ऑर्डरला मदत होईल आणि व्यवसाही वाढेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like