Instagram मध्ये आलंय नवं फिचर, Live सुरु केल्यावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या फेसबुक, WhatsApp, ट्विटर आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार आपल्या युजर्सला नवंनवे फिचर देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता Instagram ने आपल्या ग्राहकांसाठी नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरच्या माध्यमातून आता कोणत्याही Live Broadcast दरम्यान फायदा होणार आहे.

Instagram ने नवे फिचर आणले आहे. यापूर्वी Live Broadcast दरम्यान फक्त एकच युजरला ॲड करता येऊ शकत होते. मात्र, आता या नव्या फिचरच्या माध्यमातून Live Broadcast दरम्यान 4 जणांना ॲड करता येऊ शकते. कोरोना महामारीत इंस्टाग्रामच्या लाईव्ह फिचरचा वापर सर्वाधिक करण्यात आला होता. सेलिब्रिटीज् दुसऱ्या सेलिब्रिटीजसोबत चॅट करण्यासाठी या फिचरचा वापर सर्वात जास्त करत होते. याशिवाय गी सेलिब्रिटीज् मीडिया संस्थांच्या लाईव्ह संभाषण करताना ते आपल्या चाहत्यांसोबत जोडले गेले होते. यासह इंस्टाग्राम लाईव्ह युजर्स क्रिएटर्स करण्यासाठी त्यांचा बॅज खरेदी करू शकता. तसेच लाईव्ह व्ह्यूअर्स होस्ट करण्यासाठीही बॅज खरेदी करू शकता. त्यामुळे व्हर्च्युअल फंडरेजिंग होऊ शकते.

असे सुरु करा लाईव्ह रूम
इंस्टाग्राम ऍपवर जाऊन तुम्हाला उजव्या बाजूला स्वाईप करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह कॅमेरा पर्यायावर टच करावे लागेल. तुम्ही तुमच्या लाईव्ह ब्रॉडकास्टला एक टायटल देऊ शकता. याशिवाय सेशन जॉईन करण्यासाठी बॅज् देऊ शकता. त्यानंतर तिघांना एक-एक करून ॲड करता येऊ शकते. इन्स्टाग्राम गेस्टनंतर ॲड करण्याचा पर्यायही दिला जातो.