GOOD NEWS : आता इन्स्टाग्रामवर करता येणार शॉपिंग

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – इन्स्टाग्रामवर फोटो, स्टोरीज अपलोड करणे हा अनेक युजर्सच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियावर अल्पावधीत लोकप्रिय झालेले तसेच फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.

इंस्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये नवीन फीचर आले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत मंगळवारी प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे.

याविषयी इन्स्टाग्रामने फेसबुक पोस्ट टाकून माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहोत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.’ याचबरोबर, इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात.

 

You might also like