तोतया पोलिसाने Insta वरून महिलेला ओढले आपल्या जाळ्यात आणि केले लैंगिक अत्याचार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याची इंस्टाग्रामवरून एका तरुणीशी ओळख झाली. या तरुणीला त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पिडीतेकडून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
किरण महादेव शिंदे याची शिर्डी येथील महिलेशी मिशो ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांनतर त्याने तिच्याशी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो टाकून शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवले. तुला पोलीस भरतीमध्ये मदत करतो. तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर, असे सांगत त्याने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर हा तोतया पोलीस असल्याचा संशय आल्याने तिने त्याची चौकशी केली असता त्याने तिला मारहाण केली. या प्रकारानंतर पीडितेने राहाता पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पोलिसाचे बनावट आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे यांच्याकडून करण्यात येत आहे.