आता App नं उघडता पाहा कोणाचंही प्रोफाइल, Instagram मध्ये आलंय QR Coad फीचर, या पध्दतीनं करा जनरेट, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. इंस्टाग्राममध्ये कंपनीने क्यूआर कोडचा सपोर्ट देणे सुरू केले आहे. काही काळ त्याची चाचणी केली जात होती आणि आता ते सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हा क्यूआर कोड कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपवरून स्कॅन केला जाऊ शकतो. तसेच तुम्ही इन्स्टाग्राम न उघडता क्यूआर कोडद्वारे कोणाचेही प्रोफाइल पाहू शकता. इंस्टाग्राम क्यूआर कोड एक वर्षापूर्वीच जपानमध्ये सुरू झाला होता. मात्र हे फिचर आता इतर देशांमध्ये आणले गेले आहे.

इंस्टाग्रामवर आपला व्यवसाय चालवणार्‍या लोकांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. याद्वारे व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतात, कारण आजकाल इंस्टाग्रामवरून शॉपिंग देखील जोरदार सुरू आहे. हा क्यूआर कोड प्रिंट केला जाऊ शकतो आणि बर्‍याच ठिकाणी लावला जाऊ शकतो जिथे लोक तो पाहू शकतील, जसे कि दुकान इत्यादी. ज्यांना कंपनीची आवड आहे, ते क्यूआर कोड स्कॅन करून इंस्टाग्रामवर त्यांचे प्रोफाइल तपासू शकतात.

अशा प्रकारे क्युआर कोड जनरेट करा

सर्वप्रथम क्यूआर कोड जनरेट करण्यासाठी युजर्सनी इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील सेटिंग्ज मेनूवर जावे.
तिथे क्यूआर कोडवर टॅप करण्याचा एक पर्याय आहे. काही युजर्सना अद्याप तिथे नेमटॅग दिसू शकतो, पण तो क्यूआर कोडमध्येच बदलला जाईल.
टॅप करताच तुमच्या युजरनेमसह क्यूआर कोडची इमेज तयार होईल.
हे इमेज म्हणून सेव्ह करून शेअरही करता येईल.
तुम्ही येथून क्यूआर कोडचा बॅकग्राउंड देखील बदलू शकता.

यापूर्वी कंपनीने नेमटॅग नावाची एक सिस्टम स्थापित केली होती, जी इन्स्टाग्राम कॅमेर्‍याने स्कॅन केली जाऊ शकत होती. हे फिचर आता पूर्णपणे नवीन क्यूआर कोडमध्ये बदलले गेले आहे. लोक केवळ कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवू शकतात.