Instagram Reels मध्ये जोडणार नवीन फीचर्स, ट्रिम आणि डिलिटचाही पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Instagram Reels हे टिक टॉक सारखे फिचर आहे. भारताकडून टिक टॉकवर बंदी आल्यानंतर फेसबुकने हे इन्स्टाग्रामवर Reels या नावाने लाँच केले होते. आता त्यात काही नवीन फीचर्स ऍड केले जात आहेत.

इंस्टाग्रामच्या नवीन अपडेटसह आता Reels चा कालावधी वाढवला जात आहे. आता ३० सेकंदांपर्यंत Reels तयार करू शकता. यापूर्वी १५ सेकंदाचे Reels बनवले जात होते.

कालावधी व्यक्तिरिक्त रिले रेकॉर्डिंग दरम्यान १० सेकंदाच्या एक्स्टेंड टाईमरचा पर्यायही दिला गेला आहे. हे अपडेट लवकरच सर्व युजर्ससाठी जाहीर केले जाईल.

नवीन अपडेटनंतर रेकॉर्डिंग दरम्यान कोणतीही क्लिप ट्रिम आणि डिलीट करण्याचा पर्याय देखील असेल. सध्या इंस्टाग्राम रिल्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

भारतात Tik Tok चा यूजरबेस खूप मोठा होता आणि बंदी आल्यापासून ही पोकळी भरुन काढण्यासाठी अनेक प्रकारचे ऍप्स आले आहेत.

इतकेच नव्हे तर अहवालानुसार, फेसबुक Reels जॉईन करण्यासाठी टॉप टिक टॉक युजर्सना कंपनी पैसेही देत आहे.

फेसबुकने जुलैमध्ये Instagram Reels लॉन्च केले होते आणि तेव्हापासून कंपनीने अपेक्षेपेक्षा कमी युजर्स कमावले आहेत. मोबाइल ऍप डेटा ऍनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरने म्हटले आहे की, अमेरिकेत Reels ला चांगला ट्रेक्शन मिळत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like