Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन जॉनसन एका पोस्टमधून कमवतो 7 कोटी रुपये ! जाणून घ्या प्रियंका आणि विराटची कमाई

पोलिसनामा ऑनलाईन – तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूड स्टार्स एका सिनेमासाठी जेवढी रक्कम घेतात तेवढे पैसे हॉलिवूड स्टार ड्वेन जॉनसन एका इंस्टा पोस्टमधून कमवतो. वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल परंतु हे खरं आहे.

सोशल मीडिया कंपनी हॉपर एचक्यु डॉटकॉमनं इंस्टावर कमाई करणाऱ्या सेलिब्रिटीजची वार्षिक यादी Instagram Rich List 2020 प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार ड्वेन जॉनसन पहिल्या नंबरवर आहे. इंस्टावरील एका पोस्टमधून तो 1,015,000 म्हणजेच जवळपास 7.4 कोटी रुपये कमावतो. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, 4 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे की, कोणीतरी कार्दशियन आणि जेनरला मगे टाकलं आहे. जॉनसनच्या उत्पन्नात 15 टक्के वाढ झाली आहे. सोशलाईट बिजनसेमन कायली जेनरच्या कमाईत 22 टक्के घट झाली आहे.

ड्वेन जॉनसनचं इंस्टावर The Rock नावानं अकाऊंट आहे. इंस्टावर रॉकचे 188 मिलियन फॉलोवर्स आहेत. प्रियंका चोपडा, सोनम कपूर, लारा दत्ता, अथिया शेट्टी, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा सहित इतरही अनेक स्टार्स त्याला फॉलो करतात. या यादीत प्रियंका चोपडाचा नंबर 28 वा आहे. प्रियंका तिच्या एका इंस्टा पोस्टमधून 2,89,000 डॉलर म्हणजेच 2 कोटींहून अधिकची कमाई करते.

प्रियंकानं ड्वेनसोबत बेवॉच सिनेमातून हॉलिवूड डेब्यू केला होता. प्रियंकाचा पती निक जोनासनंही जुमानजी सीरिजमध्ये ड्वेनसोबत काम केलं आहे.

या यादीत प्रियंकाच्याआधी विराट कोहलीचा नंबर लागतो. विराट या यादीत 26 व्या नंबरवर आहे. एका इंस्टा पोस्टमधून विराट 2,96,000 डॉलर म्हणजेच 2 कोटींहून अधिकची कमाई करतो. प्रियंका आणि त्याच्या कमाईत खूप कमी फरक आहे. विराटचे इंस्टावर 66 मिलियन आणि प्रियंकाचे 54.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. या यादीतील टॉप 100 च्या यादीत आणखी एकाही भारतीयाचा समावेश नाही.