इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणीच्या ‘बँक’ खात्यातून 46 हजार ‘गायब’, तुम्ही करु नका ‘ही’ चूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जमाना डिजिटल व्यवहारांचा आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोस्ताहन देखील देण्यात येत आहे. परंतू प्रश्न उपस्थित होतो तो चोरी होत असलेल्या वैयक्तिक डाटाचा. कोणत्याना कोणत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपला डाटा लिक झाल्याची माहिती देखील बऱ्याचदा येते. त्यामुळे याच तंत्रज्ञानाचा वापर करुन हॅकर्स डाटा चोरी करतात. कधी तुमच्या डिवाइसमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करुन तर कधी तुम्हाला फसवून तुमच्या बँकेची माहीती चोरण्यात येते.

आता तर अशी बाब समोर आली आहे की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून डाटा चोरी करण्यात आला. राजस्थानच्या जयपूरमध्ये एक फसवणूकीची घटना समोर आली आहे. जेथे रिया नावाच्या मुलीच्या अकाऊंटच्या माध्यमातून माहीती चोरुन 46 हजार रुपये चोरी केले.

असे गायब झाले पैसे –
वैशाली नगर येथील मुलीने इंस्टाग्रामच्या एका सर्व्हेमध्ये आपली खासगी माहीती दिली होती. ज्यात तिचा फोननंबर देखील सहभागी होता. त्यानंतर या फोन नंबरच्या सहाय्याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला अ‍ॅड करण्यात आले, ज्यात पहिल्यापासून 4 लोक अ‍ॅड होते.

रियाने सांगितले की या ग्रुपमध्ये डिस्काऊंटवर मिळणारे कपडे, शूज आणि ज्वैलरीशी संबंधित पोस्ट शेअर केल्या जात होत्या. यातून रियाने दोन बॅग ऑर्डर केल्या. पेमेंटसाठी ग्रुप अ‍ॅडमिनने तिला PhonePay डाऊनलोड करायला लावले. ज्यासाठी अ‍ॅडमिनकडून लिंक सेंड करण्यात आली होती. यानंतर रियाने लिंकवर क्लिक करुन तिच्या खात्यातून 46 हजार रुपये गायब केले.

सायबर एक्सपर्टचा सल्ला –
जयपूरच्या सायबर एक्सपर्ट रजत तिवारी यांनी चेतावनी दिली की कधीही मॉल, पेट्रोल पंप येथे मिळणाऱ्या कोणत्याही कूपनसाठी आपला वैयक्तिक माहिती देऊ नये. तसेच फेसबूक, इंस्टाग्राम किंवा इमेलवर आलेल्या सर्व्हेमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.

Visit : Policenama.com