‘इंस्टाग्राम’ भिडणार ‘अमेझॉन’ला, ‘इंस्टा’ची ई-कॉमर्स क्षेत्रात ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन शॉपिंगमध्ये अमेझॉन, फ्लिपकार्टनंतर आता आणखी एक कंपनी उतरणार आहे. सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारे इंस्टाग्राम आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये देखील उतरणार आहेत. इंस्टाग्रामचे जगभरात १० लाख युझर्स आहेत. सध्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये अमेझॉनचे एक छत्री अंमल आहे. इंस्टाग्राममुळे त्यांना तगडी टक्कर मिळणार आहे. इंस्टाग्रामचे नवनिर्वाचित अध्यक्ष एडम मूसेरी यांची हि योजना आहे.

मागील वर्षी त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते कि, सर्व दुकानदार, विक्रेता आणि इंस्टाग्राम यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. फेसबुक प्रमाणेच काम करणारे हे ऍप फेसबुकला एक पाऊल मागे टाकत एक सेल्स पोर्टलच्या रूपात पुढे येण्यासाठी प्रयत्न करत आहे. ई-कॉमर्स जगभरात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे इंस्टग्राम देखील या संधीचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्नशील आहे.

डिजिटल कॉमर्स ३६० च्या नुसार ई- कॉमर्सचा पसार जगभरात २.८६ ट्रिलियन डॉलर इतका आहे. सध्या ई-कॉमर्समध्ये चीनच्या अलीबाबा आणि जेडी डॉट कॉम तसेच अमेरिकेतील अमेझॉन, ईबे आणि वालमार्ट या कंपन्यांचा दबदबा आहे. भारतात सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा दबदबा आहे.
दरम्यान, इंस्टाग्रामने थेट विक्रीचा आपला प्रयत्न मार्च महिन्यातच सुरु केलेला आहे. मात्र सद्यस्थितीत तो २० ब्रँन्डस पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे कंपनी तो वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण