आर्थिकराष्ट्रीय

Instant Loan On WhatsApp | आता WhatsApp वर मिळेल ताबडतोब कर्ज, कागदपत्रांची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Instant Loan On WhatsApp | कर्ज मिळवण्यासाठी लोकांना अनेक कागदपत्रे आणि विविध प्रक्रियेतून जावे लागते. पण आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही झटपट कर्ज मिळू शकते आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. (Instant Loan On WhatsApp)

 

व्हॉट्सअ‍ॅपने अग्रगण्य क्रेडिट फर्म CASHe कडून एक विशेष क्रेडिट फीचर सादर केले आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना काही मिनिटांत कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळू शकणार आहे.

 

हे फीचर WhatsApp Business यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. या फीचर अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस प्लॅटफॉर्म यूजर्स अवघ्या 30 सेकंदात कर्ज घेऊ शकतील. यासाठी यूजर्सना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही आणि त्यांना कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. याशिवाय कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. (Instant Loan On WhatsApp)

 

अशी आहे कर्ज घेण्याची प्रक्रिया

CASHe च्या मदतीने झटपट कर्जाची सुविधा मिळवण्यासाठी, यूजर्सना प्रथम +91 80975 53191 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉक्समध्ये हाय टाईप करून मेसेज पाठवावा लागेल.

मेसेज पाठवल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि काही पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस यूजर्सना प्री-अ‍ॅप्रीव्ह्यू कर्ज दिले जाईल.

 

कुणाला मिळणार या फीचरचा लाभ ?

ही Industry First पहिली क्रेडिट लाइन सुविधा आहे, जी एआय-पॉवर्ड आहे. या सुविधेचा 24/7 लाभ घेता येईल.
हा एक कॉन्टॅक्टलेस मोड आहे जिथून त्वरित कर्ज घेता येऊ शकते.
मात्र, केवळ पगारदार ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

 

जास्तीत जास्त किती मिळेल कर्ज ?

या वैशिष्ट्यांतर्गत, केवायसी तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया एआय-पावर्ड मोडद्वारे पूर्ण केली जाईल.
यानंतर तुमची क्रेडिट लाइन ठरवली जाईल. म्हणजे, तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे,
तुम्हाला किती रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते हे ठरवले जाईल. यानंतर कर्ज तुमच्या खात्यावर पाठवले जाईल.

 

Web Title :- Instant Loan On WhatsApp | now instant loan will be available on whatsapp documents will not even be needed now process

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button