पाकिस्तान ऐवजी ‘या’ मार्गे जाणार पश्चिमेकडे भारतीय विमाने 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी आठ विमानतळावरील विमान सेवा बंद करण्यात आली होती. ती विमान सेवा सध्या सुरु करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तान मधून पश्चिमेकडील देशांना जाणारा हवाई मार्ग बदलण्यात आला आहे. आता भारताची विमाने हि मुंबई हवाई मार्गे पश्चिमेकडे वळवण्यात आली आहेत.

पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या सीमेत घुसखोरी केल्याने तातडीने काल बुधवारी पंजाब आणि कश्मीर मधील सर्व विमान तळ बंद करण्यात आले होते. अचानक सुरक्षेचा हा आदेश आल्याने अनेक प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते. त्यानंतर सायंकाळी विमानतळावरून विमान सेवा सुरु करण्यात आली. दरम्यानच्या काळात सरकारने विमानसेवा पाकिस्तानच्या मार्गाऐवजी मुंबईच्या मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला.

युरोप सहित पश्चिमेकडील देशाला जाणारी भारतीय विमाने विमानतळावरून सुटली कि दिल्लीला येऊन नंतर मुंबई मार्गे मस्कतला जातील आणि त्यानंतर ती आपला पूर्वीचा मार्ग पकडतील. या बदललेल्या मार्गावरून काल सायंकाळी पासून विमान सेवा सुरु केली आहे.