अडचणीतील साखर कारखाने विक्री करण्यापेक्षा, भाडेतत्वावर चालविण्यास देऊन थकीत रक्कम वसुल करणार- राज्य सरकार 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

राज्यातील सहकारी संस्था व कारखाने ग्रामिण भागाचा आर्थिक कणा आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांचे खाजगीकरण रोखण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सहकारी बॅंकेने थकीत कर्ज वसुलीमुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री करण्याएेवजी ते भाडेतत्वावर चालविण्यास देऊन, त्याच्या माध्यमातून थकीत कर्ज वसुलीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील बाणगंगा आणि भाऊसाहेब बिराजदार हे दोन सहकारी साखर कारखाने नुकतेच चालविण्यास देऊन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B06VWZ9DQ5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a98a864-8438-11e8-a33a-e109fecb4b84′]

या बाबतीत राज्य शासनानेही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळातर्फे (एम.सी.डी.सी) राज्य बॅंकेशी चर्चा करुन आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या आणि बॅंकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना आवश्यक तेवढा कर्जपुरवठा व भांडवलाचा पुरवठा करुन सदर कारखाने चालू स्थितीत भाडेतत्वांवर देण्याची तयारी दर्शवली आहे. या संबंधित बैठक नुकतीच सहकार आयुक्तांकडे पार पडली असून या बाबींवर राज्य शासन, राज्य बॅंक आणि महाराष्ट्र सहकारी विकास मंडळ यांच्यामध्ये एकमत झाले असून, पुढील कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे.

बाजारातील अडचणी, चुकीचे व्यवस्थापन किंवा इतर अनुषंगीक गोष्टीमुळे राज्य बॅंकेने कर्ज पुरवठा केलेले राज्यातील एकूण 25 सहकारी साखर कारखाने राज्य बॅंकेने थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियद्वारे आपल्या ताब्यात घेतले आहेत.या साखर कारखान्यांची विक्री करण्यासाठी अनेकवेळा जाहिराती देऊन देखील या कारखान्यांची विक्री होऊ शकलेली नाही.
[amazon_link asins=’B06WLNNCPG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’810e67bc-8438-11e8-9d5e-9953f3b33641′]

यामुळे थकीत रकमेवर वाढणारे व्याज, मशनरीचे होणारे अवमूल्यन, तसेच त्या परिसरातील शेतकऱ्यांना आपला ऊस देण्यासाठी लांबच्या कारखान्यावर जावे लागणार असल्याने वाहतूकीचा खर्च वाढणार. या सर्व गोष्टींचा विचार करुन सदर कारखाने भाडेतत्वांवर चालविण्यास देणेबाबतचा धोरणात्मक निर्णय राज्य बॅंकेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व त्यांच्या समिती सदस्यांनी घेतला आहे.