कळंब शहरात प्रशासनाकडून 35 जणांना केले संस्थात्मक क्वारंटाईन, 23 जणांचे घेतले नमुने

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  कळंब शहरातील ‘त्या’ गर्भश्रीमंत कुटुंब आणि काही कामगारांना अखेर प्रशासनाने आज संस्थात्मक क्वारटाईन केले. यात 35 जणांचा समावेश आहे. त्यातील 23 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे आज सोनार लाईनचा परिसर कोव्हिड प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करत सील केला आहे.

शहरात एकाच कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असणारे हे मोठे कुटुंब स्वतःहुन तपासणीसाठी पुढे येणे आवश्यक होते. परंतु ते आले नाही. त्यानंतर कामगार देखील पुढे आले नव्हते. त्यामुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू होती.

प्रशासनाला दोष देत गर्भश्रीमंताना वेगळा न्याय का असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत पोलिसनामा ऑनलाइनने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच सर्व प्रकरण बाहेर आणले. त्यानंतर आज प्रशासनाने त्यांना तात्काळ संस्थात्मक क्वारटाईन केले. तसेच तर कामगारांचा शोध घेत त्यांना देखील क्वारटाईन केले. मात्र अद्यापही संपर्कात आलेले काहीजण सापडलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने जे लोक संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःहुन पुढे यावे. तसेच आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, प्रभारी तहसीलदार अस्लम जमादार यांनी केले आहे.

प्रशासनाने उचलेल्या या ठोस पावलाने मात्र नागरिक चिंतामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे पॉझिटिव्ह असणाऱ्या त्या कुटुंबाचे दुकान, पेट्रोल पंप सील केला असल्याचे देखील सांगण्यात आले. तसेच त्यावरील कर्मचाऱ्यांना देखील तपासणीसाठी शोधले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शहरात आज एक मोठे कुटुंब आणि पॉझिटिव्ह निघालेल्या त्या कुटुंबातील कर्मचारी असे एकूण 35 जणांना क्वारटाईन केले आहे. त्यातील 23 जणांचे नमुने आज घेण्यात आले आहेत, असे जमादार यांनी सांगितले. तर आणखी काही जनांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान शहरात पारगावावरून विशेष पुणे, मुंबई तसेच औरंगाबाद अश्या ठिकणावरुन विविध घरघुती कार्यक्रम व विवाह विषयक कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांनी नोंदणी करावी. त्याची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी केले आहे. त्याची रॅपिड टेस्ट केली जाईल. जे माहिती देणार नाहीत अश्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.