Insulin Sensitivity | इन्सुलिनच्या कमतरतेने वाढतो डायबिटीज, ‘या’ 5 नॅचरल पद्धतीने वाढवा ‘या’ हार्मोनचे उत्पादन; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Insulin Sensitivity | हाय ब्लड शुगर (High Blood Sugar) किंवा डायबिटीजच्या (Diabetes) रुग्णांना तुम्ही इन्सुलिनचे डोस घेताना पाहिले असेल. मधुमेहावर नियंत्रण (Diabetes Control) ठेवण्यासाठी इन्सुलिनची गरज (Insulin Sensitivity) असते. इन्सुलिन (Insulin) हे स्वादुपिंडाद्वारे तयार होणारे हार्मोन आहे. मात्र, मधुमेही रुग्णांमध्ये (Diabetic Patients) हे हार्मोन तयार होत नाही (Health Tips For Diabetics). टाईप 1 मधुमेहामध्ये (Type 1 Diabetes) ही समस्या जन्मजात असते (Diet Tips To Boost Insulin Sensitivity Naturally).

 

त्याच वेळी, टाईप 2 मधुमेह होण्याचे कारण म्हणजे इन्सुलिनचे कमी उत्पादन किंवा शरीराचा योग्यरित्या वापर न करणे (Type 2 Diabetes Easy Lifestyle And Diet). या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर, शरीराद्वारे इंसुलिनचा योग्य प्रकारे वापर करण्याच्या प्रक्रियेला इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) म्हणतात (Insulin Sensitivity).

 

इन्सुलिन का आवश्यक आहे? (What Is Insulin And It’s Significance)
पचनसंस्था अन्नतील कार्ब्जचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करते. त्याच वेळी, इन्सुलिन या ग्लुकोजचे मेटाबॉलिज्म आणि अन्नातून मिळणारी चरबी नियंत्रित करते. इन्सुलिन शरीराला अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर पेशींना ग्लुकोजमधून ऊर्जा मिळू शकत नाही.

 

अशा स्थितीत शरीराला चरबीपासून शक्ती मिळू लागते. ही स्थिती आरोग्यासाठी हानिकारक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, इन्सुलिन शरीराला चरबीपासून शक्ती मिळण्यापासून प्रतिबंधित करते आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करते. शरीराद्वारे इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही या नैसर्गिक मार्गांचा अवलंब करू शकता.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा (Be Physically Active)
आळशी आणि व्यायाम न करणार्‍या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. यामुळे, मधुमेहाची लक्षणे देखील कमी होतात आणि तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटते.

 

वजन कमी होणे Weight Loss) –
लठ्ठपणामुळे (Obesity) मधुमेहाची स्थिती गंभीर होऊ शकते. लठ्ठपणा हे देखील मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवावे. वजन कमी करण्यासाठी योग्य जीवनशैली, व्यायाम आणि आहाराची मदत घ्या. त्यामुळे इन्सुलिनची पातळी चांगली राहील.

 

फायबर युक्त अन्न खा (Fiber-Rich-Food) –
आहारातील फायबर शरीरातील मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवते. त्यामुळे वजन कमी होते, पचनसंस्था नीट काम करते आणि शरीराची कार्ये व्यवस्थित चालतात.

 

आहाराची काळजी घ्या (Take Care Of Diet) –
मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची मोठी भूमिका असते.
तुमच्या ब्लड शुगर लेव्हल तुम्ही काय खाता यावर अवलंबून वाढते किंवा कमी होते.
हे इन्सुलिन प्रतिरोध आणि इन्सुलिन संवेदनशीलतेवर देखील अवलंबून असते. म्हणूनच आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या.

आवळा, जांभूळ, कारले, ब्रोकोली आणि भेंडी यांसारख्या भाज्या आणि फळे खा. बटाटे, साखर, गोड फळे आणि पिष्टमय पदार्थांचे सेवन टाळा.

8 तासांची झोप आवश्यक (8 Hours Of Sleep Is Essential) –
झोपेच्या कमतरतेमुळे तणाव (stress) वाढतो, जे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे.
याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकार आणि लठ्ठपणासारख्या समस्यांचा धोका वाढतो.
तज्ञांच्या मते, दररोज 8 तास झोप घेतल्याने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Insulin Sensitivity | type 2 diabetes easy lifestyle and diet tips to boost insulin sensitivity naturallyhealth tips for diabetics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

 

High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या

 

Menstrual Tips For Blood Loss | पीरियड्समध्ये खुपच रक्तस्त्राव होतो तर मग ‘हे’ उपाय अवलंबा, वारंवार पॅड बदलांपासून तुमची सुटका होईल; जाणून घ्या