माझ्याबद्दल अपशब्द काढा पण, सरदार पटेल यांच्याबाबत भाष्य नको : मोदी

राजकोट : वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्टॅच्यू ऑफ यूनिटीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले तरी हरकत नाही. पण आपल्या वक्तव्यांमुळे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तीची उंची कमी करु नये. गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी नेहमीच्या शैलीत गांधी, पटेल या काँग्रेसच्याच महान व्यक्तीमत्वांना ढाल करत राहुल गांधी आणि यूपीए सरकारवर निशाणा साधला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3dc7dc8-c52a-11e8-a9d6-118cf8853a01′]

पंतप्रधान मोदी यांनी राजकोट जिल्ह्यात महात्मा गांधी संग्रहालयासह विविध योजनांचे लोकार्पण केले. संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, आधीचा भारत आणि आताचा भारत यात मोठा फरक आहे. पूर्वी सामान्य व्यक्ती कच्चा रस्ता झाला तरी त्याला विकास मानून त्यावर समाधानी होत. आता गावातील माणसांच्या विकासाची व्याख्या बदलली आहे. गावातील लोक आता सरकारला रेल्वे, महामार्ग, माहिती मार्ग, गॅस ग्रिड, पॉवर ग्रीड आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कची मागणी करत आहेत.

एलपीजी, सीएनजीच्या दरातही वाढ

२ ऑक्टोबर १८६९ ला महात्मा गांधींचा जन्म हा फक्त एका व्यक्तीचा जन्म नव्हता तर ती एका युगाची सुरुवात होती. गांधींजीच्या सिद्धांतावरच विद्यमान सरकारने लोकांचे जीवन बदलण्याचे काम केले आहे. आता प्रत्येक गरीब व्यक्तीला घर देऊन एक मोठा बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मोदी म्हणाले.

[amazon_link asins=’B007O7J026′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4e2a289-c52c-11e8-a309-438a4d945b75′]

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील एका सभेत राहुल गांधी यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याविषयी भाष्य केले होते. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मोदीजी भलेही सरदार पटेल यांचा मोठा पुतळा बनवत असले तरी आपल्या बूट आणि शर्टप्रमाणे तोही मेड इन चायना असल्याची टीका त्यांनी केली होती. मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन केले होते. पण ते आता गुजरातच्या लोकांनाच काम देत आहेत, असे राहुल यांनी म्हटले होते.