‘Airtel’ कडून ग्राहकांना 4 लाखाचा जीवन ‘विमा’, ‘ही’ आहे धमाकेदार ‘ऑफर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Airtel चे ग्राहक असाल तर तुम्हाला कंपनी 4 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा देते. तुम्हाला फक्त एअरटेलचा 599 रुपयांचे प्रीपेड प्लॅन रिचार्ज करावे लागेल. ही विमा भारती एक्सा लाइफ इंश्योरेंस कंपनीकडून देण्यात येतो. यावर दोन्ही कंपन्याचा करार झाला आहे. सोमवारी एअरटेलकडून एक प्रीपेड प्लॅनची घोषणा केली. 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिदिवस 2 जीबी डाटा, अनलिमिडेट कॉल्स आणि डेली 100 एसएमएस मिळेल. याशिवाय ग्राहकांना 4 लाख रुपयांच्या जीवन विमा सुरक्षा कवच भारती एक्सा इंश्योरेंसकडून देण्यात येईल.

कंपनीकडून सांगण्यात आले की या रिचार्जची वैधता 84 दिवस आहे आणि जेव्हा तुम्ही पुढील रिचार्ज करतात तेव्हा तुमच्या सुरक्षा कवच कालावधी तीन महिन्यांनी वाढेल. ही जीवन विमा 18-54 वर्षांच्या ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी पेपरवर्क किंवा मेडिकल तपासणीची गरज नाही. विमा प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात लगेचच उपलब्ध होईल.

असे देखील सांगण्यात आले की जर ग्राहकांना वाटत असेल की त्यांच्या विम्याच्या कागदांची डिलीवरी त्यांच्या घरी मिळावी तर तसे देखील करण्यात येईल. विम्याचा लाभ ग्राहकांना फर्स्ट रिचार्जवर मिळेल ज्याचा तुम्हाला एसएमएस किंवा एअरटेल थॅक्स किंवा एअरटेल रिटेलरच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.

भारती एअरटेलचे सीईओ वाणी वेंकटेश यांनी सांगितले की, आम्हाला आनंद आहे की आम्ही आमच्या ग्राहकांसाठी जीवन विमा कवच उपलब्ध करत आहोत. हे आमच्या इंश्योरेंस बंडल्ड रिचार्जच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतील.

भारती एअरटेलने 599 च्या प्रीपेड रिचार्जवर जीवन विमा कवचची सुविधा काही निवडक राज्यात सुरु आहे, त्यात दिल्लीचा देखील समावेश आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की लवकर देशातील इतर भागात देखील याची सुरुवात होईल.

Visit : Policenama.com