Insurance | घरबसल्या झटपट टू-व्हीलर आणि फोर व्हिलरचा करू शकता इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – नवीन मोटर वाहन (New motor vehicle) कायदा लागू झाल्यानंतर इन्श्युरन्स (Insurance ) नसताना वाहन चालवल्यास मोठा दंड लावला जात आहे. अशावेळी जर तुम्हाला इन्श्युरन्स कंपनीमध्ये जाऊन विमा काढता येऊ शकत नसेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आपल्या वाहनांचा इन्श्युरन्स सहज करू शकता. यासाठी तुम्हाला विमा कंपनीच्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. ऑनलाइन इन्श्युरन्सच्या मोठ्या फायद्यांबाबत जाणून घेवूयात… now you can get insurance for two wheeler and four wheeler sitting at home know how to get benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

* चांगला प्लॅन निवडण्याची सुविधा
यासाठी अनेक वेबसाइटवर पाहून तुमच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडू शकता. कोणत्या फिचरसाठी वेगळी रक्कम भरावी लागते हे सुद्धा समजू शकते.

* वेळेची बचत
एजंटच्या माध्यमातून वेळ आणि पैसे दोन्हीचा भुर्दंड बसतो. डॉक्यूमेंटेंशनसाठी फेर्‍या माराव्या लागतात. ऑनलाइनमध्ये वेळेची बचत होते.

* ग्राहकांना मिळते चांगली सुविधा
ऑनलाइनवर चांगली सुविधा मिळते, जी सतत उपलब्ध असते. सर्व माहिती मिळते. डॉक्युमेंट्सची माहिती उपलब्ध होते.

* डिस्काउंटाचा मिळतो लाभ
ऑनलाइन विमा पॉलिसीत ब्रोकरला पैसे द्यावे लागत नाहीत. कंपन्या ग्राहकांना थेट सूट देतात. तुम्ही एखाद्या ऑटोमोबाइल असोसिएशनचे मेंबर असाल किंवा वाहनाला अँटी-थेफ्ट डिव्हाईस असेल तर कंपनी जादा सूट देते.

* रिन्यू सिस्टम सोपी
ऑनलाइन व्हेईकल इन्श्युरन्स रिन्यू करण्यासाठी पुन्हा फॉर्म भरावा लागत नाही. डिजिटल मोडने पेमेंट करू शकता.

* नो क्लेम बोनसचे ट्रान्सफर
वर्षभरात नुकसान भरपाईचा दावा नसेल तर पुढील वर्षी विमा पॉलिसीवर नो क्लेम बोनस (एनसीबी) मिळतो.

Web Titel :- Insurance | now you can get insurance for two wheeler and four wheeler sitting at home know how to get benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर