Insurance Policy Problems | विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Insurance Policy Problems | कोट्यावधी नागरीकांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी जीवन विमा पॉलिसी उपयुक्त पडते. कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्य आणि जीवन विमा पाॅलिसीमध्ये बरीच वाढ झालीय. पंरंतु, नवीन विमाधारकांना कोणताही त्रास झाल्यास तक्रार कोणाकडे करायची हा सवाल संभ्रमात आहे. विमा कंपनीशी संबंधित तक्रारीसाठी ग्राहकांना विमा लोकपालचा (Insurance Lokpal) पर्याय समोर आहे. विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी करायची ? याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Insurance Policy Problems)

 

ग्राहकांनी प्रथम त्यांची तक्रार विमा कंपनीकडे करावी. ग्राहक (Customer) तक्रारीसह विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे (GRO) संपर्क साधू शकता. ग्राहक विमा कंपनीच्या जवळच्या शाखेलाही भेट देऊ शकतो अथवा GRO ला मेल करू शकतो. ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी IGMS, IRDA चे ऑनलाइन पोर्टल वापरू शकता. जर 15 दिवसांनंतरही तुमची समस्या विमा कंपनीकडून सोडवली गेली नाही तर तुम्ही तुमच्या तक्रारीसह विमा नियामक IRDA कडे संपर्क साधू शकणार आहात. जर तुम्ही विमा कंपनीच्या उपाय आणि IRDA च्या निर्णयावर समाधानी नसाल तर तुम्ही तुमची तक्रार विमा लोकपालाकडे करू शकणार आहे. (Insurance Policy Problems)

 

विमा लोकपालाकडे अशी करा तक्रार –

एक महिन्यानंतरही तुम्हाला तुमच्या तक्रारीसाठी विमा कंपनीकडून (Life Insurance Policy) प्रतिसाद मिळाला नाही किंवा तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या प्रतिसादाने समाधानी नसाल तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार दाखल करू शकता.

तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील विमा लोकपाल (Insurance Lokpal) कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

विमा लोकपालला पत्र पाठवून अथवा ई-मेल (Email) करून तक्रार दाखल केली जाऊ शकते.
तुम्ही तुमची तक्रार ई-मेल करत असल्यास, तुम्हाला त्याची हार्ड कॉपी नंतर लोकपाल कार्यालयात पाठवावी लागेल.

तुमच्या पत्रामध्ये पॉलिसी क्रमांक आणि तक्रारीचे तपशील यासारखी सर्व आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्हाला संबंधित कागदपत्रे लोकपाल कार्यालयात पाठवावी लागतील.

जर तुम्ही लोकपाल कार्यालयात जात असाल तर तुम्हाला फॉर्म P-II आणि फॉर्म P-III भरावा लागेल.
तुम्ही तुमची कागदपत्रे पोस्टाने पाठवली असल्यास, विमा लोकपाल तुम्हाला हे फॉर्म भरण्यास सांगेल.

 

Web Title :- Insurance Policy Problems | how to complain about insurance policy problem or claim

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा