Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Insurance Policy Tax | आर्थिक वर्ष 2021-22 ची चौथी तिमाही सुरू आहे. पुढील काही दिवसात तुमच्या कंपनीचे एचआर तुमच्याकडून या आर्थिक वर्षाचा इन्व्हेस्टमेंट प्रुफ (Investment Proof) मागतील. जर तुम्ही टॅक्ससाठी जुने रिजिम सिलेक्ट केले असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा पुरावा द्यावा लागेल. (Insurance Policy Tax)

 

जर तुम्ही अजून संपूर्ण डिडक्शन क्लेम केला नसेल तर इन्व्हेस्टमेंट करण्यास उशीर करू नका. जर तुम्हाला सेक्शन 80सी अंतर्गत Income Tax मध्ये सूट मिळवायची असेल तर लाईफ इन्श्युरन्सच्या प्रीमियमवर (Life Insurance Premium) Tax मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट प्राप्त करू शकता.

 

Life Insurance च्या प्रीमियमवर मिळते कर सवलत
टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन सांगतात की, Income Tax Act च्या सेक्शन 80सी अंतर्गत इंडिव्हिज्युअल आणि HUF लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी (Life Insurance Policy) खरेदी करणे किंवा अगोदरपासून असलेल्या पॉलिसीच्या प्रीमियमच्या पेमेंटवर इतर इन्स्ट्रुमेंटसह एकुण 1.5 लाख रुपयांपर्यंतचा डिडक्शन क्लेम करू शकता.

 

हे डिडक्शन मिळवण्यासाठी हे आवश्यक नाही की, आपल्या भारतीय इन्श्युरन्स कंपनीकडून इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केलेली असावी.
जर तुम्ही NRI असाल किंवा असे परदेशी नागरिक आहात ज्यांचे भारतात काही टॅक्सेबल इन्कम होत आहे
तर तुम्ही देशाच्या बाहेर खरेदी केलेल्या पॉलिसीवर सुद्धा हा डिडक्शन क्लेम करू शकता. (Insurance Policy Tax)

 

BZ Policies वर मिळते सवलत
जैन यांनी यांनी सांगितले की हे डिडक्शन टर्म इन्श्युरन्स सारख्या प्युअर इन्शुरन्स प्रॉडक्टपासून ULIP सारख्या इन्श्युरन्स कम इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टसवर सुद्धा क्लेम केली जाऊ शकते.
कुणीही टॅक्सपेयर स्वता, जोडीदार किंवा मुलांच्या लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीच्या प्रीमियमच्या पेमेंटवर डिडक्शन क्लेम करू शकतो.

मिळेल इतकी सूट
एक एप्रिल 2012 च्या नंतर इश्यू करण्यात आलेल्या कोणत्याही Policy च्या सम-इंश्युअर्डच्या 10% किंवा त्यापेक्षा
कमी प्रीमियमच्या पेमेंटवर डिडक्शन क्लेम केला जाऊ शकतो.
मात्र, Physically Handicapped व्यक्तीसाठी ही कक्षा 15 टक्के आहे.
एक एक एप्रिल, 2012 पासून अगोदर खरेदी करण्यात आलेल्या पॉलिसीवर 20% पर्यंतचे डिडक्शन प्राप्त केले जाऊ शकते.

 

या अटीसुद्धा जाणून घ्या
किमान दोन वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहणार्‍या Life Insurance Policy वरच टॅक्स सवलतीचा (Tax Benefit) लाभ मिळू शकतो.
जर असे झाले नाही तर मागील वर्षाचे डिडक्शन रिव्हर्स केले जाते आणि त्या वर्षीच्या इन्कममध्ये जोडले जाते, जेव्हा पॉलिसी Lapse झाली होती.

 

Annuity Plan वर मिळते सूट
जर तुम्ही एखाद्या Annuity Plan चा प्रीमियम भरत असाल तरी सुद्धा तुम्ही 80सी अंतर्गत करात सवलत प्राप्त करू शकता.

 

Web Title :- Insurance Policy Tax | income tax benefit of one and half lakh can be claimed on these insurance policies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?’

 

Aaradhya Abhishek Bachchan | ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चनसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर केला डान्स, पाहुणेही म्हणाले…

 

Mumbai Crime | IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोट सापडल्यानं प्रचंड खळबळ