मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममधून मिळतंय 2 लाख रूपयाचं विमा ‘कवच’, ‘प्रिमीयम’ दररोज 1 रूपयापेक्षाही कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक योजना सुरु केल्या ज्या सामान्य लोकांच्या हितार्थ होत्या. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रीमियममध्ये 2 लाख रुपयांची जीवन विमा सुरक्षा योजना मोदी सरकारने उपल्बध करुन दिली. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही ती योजना आहे. या योजनेत वर्षाला 330 रुपये प्रीमियम द्यावा लागतो ज्यानंतर 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो.

कोणाला मिळेल या योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ 18 – 50 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते. याचा लाभ घेण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. जर एखादा व्यक्ती या योजनेला जोडली जाते तर 55 वर्षांच्या वयापर्यंत तो या जीवन वीमा सुरक्षेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी 330 रुपये वर्षाला असा प्रीमियम दर वर्षी देणे आवश्यक आहे. ही टर्म पॉलिसी आहे. याचा उद्देश पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा कुटूंबीयांना आर्थिक सहायता उपलब्ध करुन देणे हा आहे.

केव्हा द्यावा लागतो प्रीमियम
या योजनेत बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 31 मे पर्यंत एकदम कट केले जातात. याचा प्रीमियम दरवर्षाला द्यावा लागतो. म्हणजेच पॉलिसी धारकाला 1 जूनच्या आधी याचा प्रीमियम द्यावा लागतो. या योजनेचा प्रतिबंध भारतीय जीवन विमा निगम आणि इतर जीवन विमा कंपन्याद्वारे केले जाते. 330 रुपये प्रीमियममधून 289 रुपये विमा कंपन्यांना जातात आणि 30 रुपये एजेंटला किंवा बँकेच्या खर्चात जातात. 11 रुपये बँकेचा प्रशासकीय खर्चाच्या स्वरुपात मिळतात. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या योजनेंतर्गत कवर पॉलिसी घेण्यासाठी 45 दिवसानंतर सुरु होतो.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी