Health Insurance ची निवड करते वेळी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामारीच्या या काळात आरोग्य विमा प्रत्येकाच्या प्राथमिक गरजेमध्ये समाविष्ठ झाला आहे. विशेषकरून सिनियर सिटीझन्ससाठी तर आरोग्य विमाची आवश्यकता असते. वेगाने वाढणारा आरोग्य खर्च कुणालाही आर्थिक संकटात टाकू शकतो. अशा आकस्मित आपत्तीपासून वाचण्यासाठी आरोग्य विमा जरूरी आहे. बाजारात अनेक कंपन्या विविध प्रकारचे आरोग्य विमा सादर करत आहेत, परंतु आरोग्य विमा घेताना ग्राहकाला काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.

1 सध्याचे आजार कव्हर व्हावेत

ग्राहकाने आरोग्य विमा घेण्यापूर्वी हे जाणून घेतले पाहिजे की, पॉलिसीमध्ये सध्याचे आजार कवर होत आहेत किंवा नाही. नेहमी त्या विमा योजनेची निवड करणे चांगले असते, जी ग्राहकाचा सध्याचा आजार कव्हर करत असेल आणि ज्यामध्ये कमी वेटींग पिरियड असावा.

2 को-पेमेन्ट क्लॉज

को-पेमेंट ती रक्कम असते, जी स्वत: पॉलिसीधारकाला विमित सेवांसाठी भरावी लागते. ही रक्कम अगोदर ठरलेली असते. सिनियर सिटीझन्ससाठी बाजारात उपलब्ध बहुतांश विमा पॉलिसीज को-पेमेन्टच्या शर्थीसोबतच येतात. अशावेळी ग्राहकाला ती विमा पॉलिसी निवडली पाहिजे, ज्यामध्ये त्यास कमीतकमी को-पमेंट द्वावे लागेल. याशिवाय ग्राहक को-पमेन्टची अट हटवण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकतो. यासाठी ग्राहकाला अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागतो.

3 क्लेमची रक्कम असावी जास्त

विमा पॉलिसीमध्ये गंभीर आजारांसाठी क्लेमची रक्कम जास्त असावी. बाजारात उपलब्ध अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये काही गंभीर आजारांवर क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असते. ग्राहकाला विमा पॉलिसी घेण्यापूर्वी याबाबत माहिती घेतली पाहिजे. यासाठी ग्राहकाला गंभीर आजारांच्या कव्हरसाठी लिस्टसह सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

4 देय रक्कम मर्यादा

ग्राहकासाठी नेहमी अशी इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे चांगले ठरू शकते, जी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर पूर्ण खर्च कव्हर करेल. बाजारात उपलब्ध अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये एका मर्यादेनंतर रूम किंवा आयसीयूचे पैसे पॉलिसीधारकालाच भरावे लागतात. यासाठी पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाने याबाबत जाणून घेतले पाहिजे.

5 एकसोबत प्रीमियम जमा करण्यावर सूट

बाजारात उपलब्ध अनेक विमा पॉलिसीजमध्ये जास्तीत जास्त पॉलिसी टर्मवर एकरकमी प्रीमियम जमा केल्यास सूट देतात. पॉलिसी टर्म कमाल तीन वर्षांची असू शकते. ग्राहक एकसोबत प्रीमियम जमा करून या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.