बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट विषयावर 18 डिसेंबर रोजी संवाद कार्यक्रम

पुणे – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इनोव्हेशन कौन्सिल तर्फे ‘मोटिव्हेशनल सेशन बाय इनोव्हेटर्स ‘या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ डिसेंबर रोजी दुपारी १ २ते १ या वेळेत हा संवाद कार्यक्रम आयोजित आला आहे.बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट विषयावर डॉ. सुनीता धोत्रे संवाद साधणार आहेत.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि शाश्वत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.