पाकिस्तानी दहशतवादी भारतीय सैन्य तळांवर हल्ल्याच्या तयारीत, सैन्याच्या गुप्तचर संस्थेकडून ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. यासंबंधित सेनेच्या गुप्तचर संस्थेनुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार दहशतवादी पठाणकोट, अमृतसर, श्रीनगर आणि इतर मेट्रो सिटीमध्ये हल्ल्याच्या तयारीत आहे. एका माहितीनसुार विविध भागात हे दहशतवादी गट घुसले आहेत आणि हे 5 ते 10 दहशतवादी असण्याची शक्यता आहे.

अलर्टनुसार, दशहतवादी मजूरांच्या वेशात आहेत. तसेच मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसच्या काही लोकांवर देखील संशय आहे. हे लोक दहशतवाद्यांना मिळालेले असू शकतात. त्याचे लक्ष एअरबेस आणि सुरक्षा दलाचे काही मोठे मुख्यालय आहेत.

दहशतवादी मजूरांच्या वेशात
एका वृत्तानुसार, दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचा विचार करुन श्रीनगर, अवंतीपूर, जम्मू, पठानकोट, हिंदोन सह सर्व प्रमुख एअरबेसवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही संपूर्ण हल्ल्यामुळे जैश ए मोहम्मदचा हात आहे.

आज भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तमिळनाडूमध्ये चेन्नईत आहेत तेथे ते भारतीय नौदलाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी बालाकोटवरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले, ते म्हणाले पाकिस्तान पुन्हा एकदा बालाकोटच्या दहशतवादी तळावर दहशतवाद्यांना सक्रिय करत आहे. परंतू चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण आपले सैन्य त्यांना तोंड देण्यासाठी पूर्णता: तयार असल्याचे सांगितले.

Visit : policenama.com