‘मुलगी ‘पशु’ नाही तर स्वतंत्र मनुष्य आहे, तिला स्वतःचे अधिकार’ : हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   हिमाचल प्रदेश हायकोर्टाने एका आंतरजातीय जोडप्याच्या याचिकेवर सुनावणी करत आपला निर्णय दिला. आपल्या निर्णयात हायकोर्टाने म्हंटले कि, मुलगी हि, पशु नाही किंवा निर्जीव वस्तूही नाही, तर एक स्वतंत्र व्यक्ती आहे, जिला आत्मा आहे आणि जिच्याजवळ अधिकार आहेत. सज्ञान झाल्यावर ती आपले निर्णय स्वतः घेऊ शकते. न्यायमूर्ती विवेक सिंह ठाकूर यांनी आंतरजातीय विवाहाच्या समर्थनात वेद आणि भागवत गीतेचा देखील उल्लेख केला. ज्यात म्हंटले कि, भारतात एका महिलेला नेहमीच ना केवळ समान मानले जात होते, तर वैदिक युगात स्त्रिया पुरुषांपेक्षा उच्च मानल्या जात होत्या. दरम्यान, मध्ययुगीन काळात आपल्या समाजात काही वाईट गोष्टी घडून आल्या, ज्या आता वर्तमान काळात संपविण्याची गरज आहे. न्यायमूर्ती विवेकसिंग ठाकूर यांच्या खंडपीठाने उच्च जातीच्या महिलेचा खालच्या जातीच्या व्यक्तीशी विवाहा संबंधित याचिकेवर सुनावणी घेत हा निर्णय दिला आहे.

कोमल परमार नावाच्या या युवतीने कोर्टात सांगितले की, कुटूंबाकडून लग्नासाठी विरोध मुख्यत: जातीमध्ये अंतर असल्यामुळे केला जात आहे आणि तिच्या वडिलांनी केलेल्या युक्तिवादाचा काहीही अर्थ नाही, ज्यात याचिकाकर्ता आर्थिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे आणि मुलगी मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे म्हंटले गेले. या युक्तिवादातून त्यांचे लग्न पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीला दिलेले विचारस्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे अधोरेखित करुन कोर्टाने सांगितले की, आम्ही राज्यघटनेच्या अधीन असलेल्या राज्यात राहत आहोत आणि जातीवर आधारित जोडीदार निवडण्याच्या हक्काचा भेदभाव करणे हे भारतीय राज्यघटनेअंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.