तीन महिन्यांपासून पीएफ खात्यात झाले नाही व्याज जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दर महिन्याच्या महिन्याला आपल्या १७ कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून जमाच केलेली नाही. ईपीएफओचा पैसा बाजारात लावण्याचे सूतोवाच सरकारने अलीकडेच केले होते. त्यामुळे आपला पैसा बुडाला तर नाही ना, असा संशय कर्मचाऱ्यांत निर्माण झाला आहे. आणखी महिनाभर तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर हे व्याज जमा होण्याची शक्यता नाही.

[amazon_link asins=’9350781220′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f954925-9abb-11e8-9e37-1955de7f83d5′]

देशात सुमारे १७ कोटी ईपीएफओचे खातेधारक आहेत. त्यापैकी ५ कोटी खातेधारक सक्रिय आहेत. २० अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था ईपीएफओच्या कक्षेत येते. २०१५-१६ मध्ये ९,२१,००० नोंदणीकृत कंपन्या ईपीएफओच्या कक्षेत होत्या. २०१६-१७ मध्ये ही संख्या १०.२ कोटी झाली. सक्रिय खातेधारकांना नियमित वेतन मिळते, तसेच त्यांच्या ईपीएफओ खात्यावर नियमित रक्कमही जमा होते. मूळ रकमेबरोबर प्रत्येक महिन्याला व्याजही जमा होत असते. तथापि, या वर्षी मार्चनंतर व्याज जमा होणे थांबलेले आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा जीएसटी आणि अन्य केंद्रीय कराबाबत काही समस्या होत्या. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून रक्कम मिळण्यास उशीर झाला आहे. व्याजदरात बदल झाल्यावर तांत्रिक व्यवस्था बदलावी लागते. नव्या कंपन्या ईपीएफओत दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठीही सॉफ्टेवअर अद्ययावत करावे लागत आहे. त्यामुळे उशीर झाला आहे.