Interest on PF : साडे 6 कोटी लोकांसाठी खुशखबर ! पुढील महिन्यात मिळू शकतात ‘हे’ पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Interest on PF | खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणार्या करोडो लोकांना लवकरच EPFO कडून भेट मिळणार आहे. वास्तविक पीएफवरील व्याजदर (Interest Rate on PF) आधीच ठरलेला आहे. आता त्यावर अर्थ मंत्रालयाकडून (Finance Ministry) शिक्कामोर्तब होण्यास विलंब झाला आहे. यानंतर, EPFO सदस्यांच्या पीएफ खात्यात (PF Account) कधीही व्याज जमा केले जाऊ शकते. (Interest on PF)
झालेली नाही अधिकृत घोषणा
वृत्तानुसार, सरकार पीएफ खातेधारकांना पुढील महिना संपण्यापूर्वी म्हणजेच 30 जूनपूर्वी कधीही व्याजाचे पैसे हस्तांतरित करू शकते. मात्र, याबाबत EPFO कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही किंवा सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.
पीएफवरील व्याजदर निश्चित करण्यात आल्याने, लवकरच त्यांच्या खात्यात व्याजाचे पैसेही जमा होतील, अशी लोकांची अपेक्षा आहे. याचा फायदा ईपीएफओच्या साडेसहा कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे. (Interest on PF)
—
सध्या इतके कमी मिळत आहे व्याज
सध्या पीएफवरील व्याजदर अनेक दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे. ईपीएफओने 2021 – 22 साठी पीएफचा व्याजदर 8.1 टक्के निश्चित केला आहे. 1977 – 78 पासून पीएफवरील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 2020 – 21 मध्ये पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज मिळत होते.
2020 – 21 या आर्थिक वर्षात पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2019 – 20 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला होता.
अशी होते ईपीएफओची कमाई
ईपीएफओ पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेले पैसे अनेक ठिकाणी गुंतवते.
या गुंतवणुकीतून मिळणार्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.
सध्या, ईपीएफओ 85 टक्के हिस्सा डेट ऑप्शन्समध्ये गुंतवते. यामध्ये सरकारी सिक्युरिटज आणि बाँडचा समावेश आहे.
उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. डेट आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर पीएफचे व्याज ठरवले जाते.
Web Title :- Interest on PF | epfo latest update interest rate credit date how to check balance and other details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update