Interest On Saving Account | ‘या’ बँका देत आहेत सेव्हिंग्ज अकाउंटवर सर्वात जास्त व्याज, येथे चेक करा व्याजदर
नवी दिल्ली : Interest On Saving Account | बचतीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक सहसा बचत खात्याचा वापर करतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही पैसे जमा किंवा काढू शकता. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला बँकेकडून व्याज देखील दिले जाते. त्याचा व्याजदर जास्त नसतो. इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत यावर मिळणारे व्याज खूपच कमी आहे. (Interest On Saving Account)
बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर दिला जाणारा व्याजदर प्रत्येक बँकेत बदलतो. त्यात फारसे बदल होत नाहीत, पण रिझर्व्ह बँक जेव्हा रिव्हर्स रेपो रेट बदलते तेव्हा त्यातही चढ-उतार होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगत आहोत ज्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत. (Interest On Saving Account)
या बँका देत आहेत बचत खात्यावर सर्वाधिक व्याज
बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा सध्याचा कमाल व्याजदर ७.५ टक्के आहे. त्याच वेळी, एयू स्मॉल फायनान्स बँक, डीसीबी बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर ७% पर्यंत व्याज दिले जात आहे. यानंतर बंधन बँक, CSB बँक आणि RBL सारख्या बँका बचत खात्यावर ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. मात्र, या सर्व बँकांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे.
किती ठेवावा मिनिमम बॅलन्स?
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यात तुम्हाला २,००० ते ५,००० रुपये किमान बॅलन्स मेंटेन करणे
आवश्यक आहे. तर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत २,५०० ते १०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागतात.
डीसीबी बँकेत तुमचा सरासरी मासिक बॅलन्स २,५०० ते ५,००० रुपये असला पाहिजे.
याशिवाय बंधन बँकेतही तुम्हाला इतकाच बॅलन्स ठेवावा लागतो.
सिनियर सिटीजनला जास्त लाभ
ज्येष्ठ नागरिकांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर उर्वरित लोकांच्या तुलनेत जास्त व्याज दिले जाते.
अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर ५० बेसिस पॉइंट म्हणजेच ०.५० टक्के
दराने अतिरिक्त व्याज देतात.
Web Title :- Interest On Saving Account | savings account interest rate these banks are giving highest interest on savings account check interest rates
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा बोपदेव घाटात खून