‘कोरोना’च्या संकटातच सर्वसामान्यांना मोठा झटका ! ‘PPF – सुकन्या’सह ‘या’ बचत योजनांवरील व्याज दरात मोठी ‘कपात’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा कहराच्या दरम्यान केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. नवीन व्याजदर 2021-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीसाठी आहेत. सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदर 1.4 टक्क्यांनी कमी केले आहेत. छोट्या बचत योजनांवरील व्याज तिमाही आधारावर सूचित केले जाते.

PPF ने केली व्याज दरामध्ये 0.80 टक्के कपात
PPF वरील व्याज दरामध्ये 0.80 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. या कपातीनंतर एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळेल. तर किसान विकास पत्रावर 0.70 टक्के व्याजदर कमी करून 6.9 टक्के करण्यात आले आहेत. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर 1.10 टक्के व्याज कमी झाले असून या अंतर्गत गुंतवणूकदारांना 6.8% व्याज मिळेल. तथापि, सरकारने बचत खात्यावर व्याज दर केवळ 4 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त 5 वर्षाच्या रेकरिंग डिपॉझिटवर 1.4 टक्क्यांची कपात केली गेली आहे, त्यानंतर आता नवीन दर 8.8 टक्के होईल. त्याचबरोबर 5 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के करण्यात आला आहे. त्यात 1.2 टक्के कपात केली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 8.6 टक्के होते. सुकन्या समृद्धि योजनेवर व्याज दर 8.4 टक्क्यांवरून कमी करून 7.6 करण्यात आला आहे जो पहिल्या तिमाहीत लागू होईल. त्याचबरोबर एक ते तीन वर्ष मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर कमी करून 5.5 टक्के करण्यात आला आहे, जो यापूर्वी 6.9 टक्के होता. त्यात 1.4 टक्के कपात केली आहे. त्याचबरोबर 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवरील व्याज दर 7.7 वरून 6.7 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.

बँकांनी ग्राहकांना तीन ईएमआयमध्ये दिला दिलासा
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने ईएमआयवर सूट दिल्यानंतर अनेक बँकांनी ग्राहकांना दिलासा देत तीन महिन्यांचे कर्ज ईएमआय पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदत कर्ज घेतलेल्या ग्राहकांना पुढील तीन महिन्यांपर्यंत त्यांचे हप्ते फेडण्याची मुभा दिली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या घोषणेनंतर बहुतांश बँकांनी मार्चमधील ईएमआय जूनमध्ये घेण्याचे सांगितले, तर काही बँकांनी ईएमआयचा पर्याय ठेवला जर एखाद्याला ईएमआय भरणे सुरू ठेवायचे असेल तर तो ईएमआय भरु शकतो.