Interest Rates On PPF SSY KVP | ‘पीपीएफ’ – ‘सुकन्या समृद्धी’ सारख्या योजनांच्या व्याजदराला सुद्धा लागणार कात्री ! मोठ्या धक्क्याची तयारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Interest Rates On PPF SSY KVP | अलीकडेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएफवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. ईपीएफनंतर (EPF) आता छोट्या बचत योजनांच्या व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अल्पबचतींच्या कक्षेत येणार्या सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ Public Provident Fund (PPF) आणि किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक (Small Savings Schemes) करणार्या कोट्यवधी लोकांना मोठा फटका बसेल. (Interest Rates On PPF SSY KVP)
का आहे शक्यता –
RBI ने आपल्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी‘ रिपोर्टमध्ये म्हटले आहे की लहान बचत योजनांचे सध्याचे व्याजदर तुलनात्मक आधारावर 42 – 168 बीपीएस जास्त आहेत. भारत सरकारने 31 डिसेंबर 2021 रोजी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरांचे पुनरावलोकन केले होते आणि सलग सातव्या तिमाहीत ते अपरिवर्तित ठेवले होते. सरकार 31 मार्च रोजी 2022 – 23 च्या पहिल्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरांचे पुनरावलोकन करेल, अशी अपेक्षा आहे.
छोट्या बचत योजनांवरील व्याजदर :
PPF वर 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तर सुकन्या समृद्धी खात्यावर, व्याजदर वार्षिक 7.6 टक्के आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर वार्षिक 7.4 टक्के आहे. इतर लहान बचत योजनांमध्ये, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक 4 टक्के व्याजदर मिळतो. (Interest Rates On PPF SSY KVP)
तसेच 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खात्यावर (आरडी) वार्षिक 5.8 टक्के व्याजदर आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते, 6.6 टक्के वार्षिक व्याजदर, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 6.8 टक्के व्याजदर आणि किसान विकास पत्रावर 6.9 टक्के व्याजदर आहे.
—
EPF वर 4 दशकातील सर्वात कमी व्याजदर :
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने अलीकडेच ईपीएफवरील व्याजदर 8.1 टक्के कमी केला,
जो गेल्या सुमारे चार दशकांतील सर्वात कमी आहे.
Web Title :- Interest Rates On PPF SSY KVP | after epf rate cut will interest rates on ppf sukanya samriddhi small savings schemes detail here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update