‘आयकॉनिक’ सिनेमा ‘शोले’च्या पडद्यामागील ‘या’ गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार अमिताब बच्चन आणि धर्मेंद्रसह मल्टीस्टारर आणि हिट सिनेमा शोलेबद्दल आपल्याला सर्वकाही माहितीच आहे. परंतु शोलेच्या पडद्यमागे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं हा सिनेमा आयकॉनिक बनतो. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना याबाबत कल्पना नसेल की, रमेश सिप्पी यांनी या हा सिनेमा तयार करायला घेण्याआधी अनेक फिल्म निर्मात्यांनी हा सिनेमा घेण्यास नकार दिला होता.

सुरुवातीला सलीम-जावेद यांनी फक्त चार ओळींची कथा लिहिली होती. ज्यामुळं जवळपास सगळ्यांनी हा सिनेमा घेण्सास नकार दिला. परंतु शोले सुपरहिट झाल्यानंतर पटकथा लेखकांना योग्य मानधन मिळण्यास सुरुवात झाली. हा सिनेमा तयार करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला आणि ओव्हरबजेटही जात होता. रिलीजनंतर हा सिनेमा 25 आठवडे थिएटरमध्ये चालला. मुंबईच्या ग्रांट रोडवरील मिनरेवा टॉकीजमध्ये तर शोले पाच वर्षे चालला.

अनेक पात्र हे खऱ्या आयुष्यातील
याची तर कोणाला कल्पनाही नसेल की, सिनेमात असलेले काही पात्र तर सलीम-जावेद यांच्या खऱ्या आयुष्यातील आहे. सुरमा भोपाली खऱ्या आयुष्यात भोपाळमध्ये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करायचा. यावरून हे पात्र आलं आहे. सलीम खानच्या विरेंदरसिंग आणि जयसिंग यांच्या नावारून जय आणि वीरू ही पात्रं घेण्यात आली आहेत.

शुटींगविषयी थोडक्यात…
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे या गाण्याच्या शुटींगसाठी 21 दिवस लागलेले. जय बच्चन यांच्या कंदील घेऊन असलेल्या सीनसाठी 20 दिवस लागले. अमजद खानला कितने आदमी थे या जगप्रसिद्ध डायलॉगसाठी 40 रिटेक द्यावे लागले. ठाकुर आधी सेना अधिकारी दाखवला जाणार होता. परंतु काही आवश्यक परवानगी मिळण्यासाठी वेळ लागल्यानं, प्रोसिजर अडकल्यानं हा निर्णय बदलण्यात आला.