Budget 2019 LIVE Updates: मध्यम वर्गीयांना खुशखबर! एवढ्या लाखापर्यंतच्या उत्पन्नाला नसणार कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपला शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प पियुष गोयल यांच्या माध्यमांतून मांडला आहे. व्यक्तिगत करदात्यांना काही तरी सवलत देऊन सरकार खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असणार असल्याची शक्यता आज सत्यात बदललेली पाहण्यास मिळाली आहे. व्यक्तिगत करदात्यांच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आले असून करासाठी असणाऱ्या २.५ लाख उत्पन्न मर्यादेत बदल करून ५ लाख उत्पन्नावर आता कर लागणार आहे असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे.

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थ संकल्प असल्याने त्यांनी सामान्य जणांना मोठी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या कर सवलतीचा ३ कोटी लोकांना फायदा होणार आहे. मोदी सरकारने सामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या दुःखावर मलम लावून आम्ही तुमच्यासाठीच आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार थेट देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दुष्काळाने आणि कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केले आहे.